पुसला येथे श्रमदानातून साकारले बंधारे
By admin | Published: May 10, 2017 12:18 AM2017-05-10T00:18:54+5:302017-05-10T00:18:54+5:30
पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित वॉटरकप स्पर्धेत बहुसंख्येने नागरिक एकत्र येऊन श्रमदानाकरिता एकवटले आहे. यातून मातीचे बंधारे साकारले आहेत.
वॉटरकप स्पर्धा : शेकडो ग्रामस्थांचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसला : पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित वॉटरकप स्पर्धेत बहुसंख्येने नागरिक एकत्र येऊन श्रमदानाकरिता एकवटले आहे. यातून मातीचे बंधारे साकारले आहेत.
वरूड तालुक्यातील पुसला गावातील नागरिक पाणी फाऊंडेशन ‘वॉटरकप’ उपक्रमात सहभागी झाले आहेत. मातीचे बंधारे साकारले जात आहे. नागरिकांनी पुसला गाव दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला असून सर्वत्र उत्साह संचारला आहे. ‘वॉटरकप’ स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. श्रमदानाच्यावेळी सरपंच सारिका चिमोटे, उपसरपंच अतुल बगाडे, पंचायत समिती उपसभापती चंदू अळसपूरे, जि.प.सदस्य राजेंद्र पाटील, तहसीलदार आशिष बिजवल, गटविकास अधिकारी, अतुल काळे, ग्रामसचिव पी.पी.मानकर, प्रकाश अळसपुरे, यादवराव तरार, दिलीप टाकरखेडे, किरण चिमोटे, अमीत खेरडे, रोषन भाकरे, सचिन डोंगरे, प्रणय सोंडे, सुनील चिमोटे, धनराज बमनोटे, अजाब बोदड, सुभाष डोंगरे, पतंजली योग समिती, आर्ट आॅफ लिव्हिंग पदाधिकारी, जायंट्स ग्रुप, व्यापारी संघटना, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा, मदतनिस, शिक्षक आदींनी सहकार्य केले.