आंतरराज्यीय दोन टोळ्यांनी केल्या शहरात घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 01:16 AM2019-02-22T01:16:31+5:302019-02-22T01:17:31+5:30

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडीतील आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपींना अटक केल्यानंतर आता दुसरी टोळीसुद्धा गजाआड केली. या दोन्ही टोळ्यांतील आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

Burglary in the city of Inter-State Two Tribes | आंतरराज्यीय दोन टोळ्यांनी केल्या शहरात घरफोड्या

आंतरराज्यीय दोन टोळ्यांनी केल्या शहरात घरफोड्या

Next
ठळक मुद्देनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त : आणखी दोन आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडीतील आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपींना अटक केल्यानंतर आता दुसरी टोळीसुद्धा गजाआड केली. या दोन्ही टोळ्यांतील आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यातील अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.
गुरुवारी पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेतून या टोळ्यातील चोरांची माहिती माध्यमांना दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने उत्कृष्ट टीम वर्क करून या घरफोडींचा छडा लावल्याचे हे यश कौतुकास्पद असल्याचे सीपी बाविस्कर म्हणाले. शहरात खिडकी टोळीने धुमाकूळ घालून राठीनगर व शारदानगरातील टावरी यांच्याकडे रात्रीतून चोरी करून पलायन केले. एका पाठोपाठ घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे चोरांनी पोलिसांना आव्हानच केले होते.
काही महिन्यांपासून गुन्हे शाखेचे पोलीस चोरींचा मागोवा घेत होते. दरम्यान, पोलिसांनी नुकतेच मालेगावातून सैय्यद शिराज सै.लियाकत (रा.बिड) व शेख फिरोज शेख रहमान (रा.अहमदनगर) या दोघांना अटक केली. त्यांनी राजापेठ हद्दीतील हरिओम कॉलनीतील रहिवासी अमोल चव्हाण यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी शेख फिरोज हा चारचाकी वाहनाने सै.शिराज, शेख सिंकदर शेख अख्तर, शेख बबलू शेख रहेमान व शंकर तानाजी जाधव यांना घेऊन अमरावतीत येत होता. याच आरोपींच्या चौकशीत सै.सिंकदर व शेख बबलू या दोघांनी शारदानगरातील टावरी यांच्याकडे चोरी केल्याचे स्पष्ट झाले.
पोलीस पथकाने गुरुवारी सै. सिंकदरला ताब्यात घेतले असून, दुसऱ्या पथकाने आरोपी शंकर तानाजी जाधव याला औरंगाबाद येथून ताब्यात घेतले. आरोपींनी नीलेश टावरी, राठीनगरातील सुधीर बारबुद्धे यांच्याकडे चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईमुळे शहरातील चोरी प्रकरणावर वचक बसणार आहे.

शेजारी आपले सुरक्षक
शहरातील घरफोड्या व चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्याचे प्रयत्न पोलीस करीत आहे. मात्र, जनतेनेही स्वत:च्या संपत्तीच्या सुरक्षेसाठी काळजी घेणे आवश्यक आहे. सदनिका व बंगले असलेल्या ठिकाणी वॉचमन व सीसीटीव्ही कॅमेरे लाववेत, बाहेरगावी जाताना शेजाºयांना कळवावे, शेजारीच आपले सुरक्षक असून, नागरिकांनी आपल्या सुरक्षेविषयी काळजी घ्यावी, असे आवाहन सीपी बाविस्कर यांनी केले.

नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस पथकाने आरोपींकडून एमएच २७ बीडी ६२४३, कार क्रमांक एमएच १६ बी झेड ३७८६ जप्त केली. याशिवाय आरोपी सैय्यद लियाकतकडून १०० गॅमचे सोने व आरोपी शेख फिरोजकडून ५०० ग्रॅम वजनाची चांदी असा एकूण ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

प्रत्येकी पाच हजारांचा रिवार्ड
शहरातील घरफोड्यांच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, यशवंत सोळंके व प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे चार पथके तयार केली होती. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर पथकाचे प्रमुख होते. त्यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण गवंड यांच्या पथकातील उमेश कापडे, सुभाष पाटील, निखिल माहुरे, पोलीस उपनिरीक्षक राम गित्ते यांच्या पथकातील एएसआय अरुण कोडापे, अजय मिश्रा, सैय्यद इमरान, राजू आप्पा बाहेनकर, दिनेश नांदे, चालक दत्ता, पोलीस उपनिरीक्षक आशिष देशमुख यांच्या पथकातील एजाज, देवेंद्र कोठेकर, चालक अमोल, चौथ्या पथकातील पोलीस हवालदार प्रकाश जगताप, जावेद अहमद, सुधीर गुडधे व संग्राम भोजने यांनी उत्कृष्ट टीम वर्क करून घरफोडी प्रकरणांचा तातडीने छडा लावला. पोलीस आयुक्तांनी प्रत्येकी पाच हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Web Title: Burglary in the city of Inter-State Two Tribes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर