उर्वशी नगरात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:12 AM2021-01-22T04:12:28+5:302021-01-22T04:12:28+5:30

अमरावती : गाडगेनगर ठाण्यांतर्गत उर्वशीनगरात अज्ञाताने घरफोडी करून १५,२५० रुपयांचे चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना ८ ते २० ...

Burglary in Urvashi town | उर्वशी नगरात घरफोडी

उर्वशी नगरात घरफोडी

Next

अमरावती : गाडगेनगर ठाण्यांतर्गत उर्वशीनगरात अज्ञाताने घरफोडी करून १५,२५० रुपयांचे चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना ८ ते २० जानेवारी दरम्यान घडली. गजानन दादाराव ठवळी (५१, रा. उर्वशीनगर कठोरा रोड) यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. फिर्यादी हे त्यांच्या मुळगावी गेले असता अज्ञात चोरट्याने घरफोडी केली.

--------------------------------------------------------------------------------

महाजनपुऱ्यात अवैध दारू पकडली

अमरावती : खोलापुरीगेट पोलिसांनी येथील महाजनपुऱ्यात कारवाई करून १५६० रुपयांची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. आरोपी दिनेश सुधाकर हरणे ( रा. महाजनपुरा) विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

--------------------------------------------------------------------

बेलपुऱ्यात दारू जप्त

अमरावती : राजापेठ पोलिसांनी येथील बेलपुरा येथून २४९६ रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदविला. आरोपी अंकुश राजु गुडघे (२७, रा. संजय गांधीनगर नंबर २) याच्या ताब्यातून पोलिसांनी दारू जप्त केली.

----------------------------------------------------------------

ऑटोचालकावर गुन्हा

अमरावती : सार्वजनिक रस्त्यावर ऑटो उभा ठेवून वाहतुकीला अडथला निर्माण केल्याच्या कारणावरून खोलापुरीगेट पोलिसांनी एका ऑटोचालकाविरुद्ध बुधवारी गुन्हा नोंदविला. श्रीदीप रघुचंद लोणारी (३२, रा. परलाम ता. भातकुली) असे आरोपीचे नाव आहे. त्याने एमएच २७ एएफ १३१९ हा ऑटो रस्त्यात उभा केला होता.

-------------------------------------------------------

शिंगणापूरनजीक वाहतूक पोलिसांची वाहन तपासणी

अमरावती : प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी भरून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर खोलापूर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. शिंगणापूर ते खोलापूरच्या मधात ही कारवाई करण्यात आली. यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: Burglary in Urvashi town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.