स्मशानभूमीतील दफन केलेले अर्भक गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:23 AM2019-05-10T00:23:52+5:302019-05-10T00:24:21+5:30

गर्भपातामुळे दगावलेले साडेचार महिन्यांचे नवजात हिंदू स्मशानभूमीलगत असलेल्या दफनभूमीत गत महिन्यात पुरले होते. अवघ्या तीन आठवड्यांत हे मृत नवजात गाडलेल्या ठिकाणावरून गायब करण्यात आल्याचे गुरुवारी उघडकीस आले. याबाबत कुटुंबीयांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

 Burial buried in the graveyard! | स्मशानभूमीतील दफन केलेले अर्भक गायब!

स्मशानभूमीतील दफन केलेले अर्भक गायब!

Next
ठळक मुद्दे‘लोकमत’च्या वृत्तामुळे घटना उघड : पित्याची राजापेठ पोलिसांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गर्भपातामुळे दगावलेले साडेचार महिन्यांचे नवजात हिंदू स्मशानभूमीलगत असलेल्या दफनभूमीत गत महिन्यात पुरले होते. अवघ्या तीन आठवड्यांत हे मृत नवजात गाडलेल्या ठिकाणावरून गायब करण्यात आल्याचे गुरुवारी उघडकीस आले. याबाबत कुटुंबीयांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. हा प्रकार अघोरी विद्या की प्रशासनाच्या ढिसाळ कारभारातून घडला, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अमोल सुरेश नागपूरकर (३०, रा. मोतीनगर) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. कुुटुंबात गर्भपात झाल्यानंतर २५ एप्रिल रोजी साडेचार महिन्यांचे मृत नवजात महाकाली मंदिरालगत असलेल्या दफनभूमीत अडीच फूट खोल खड्डा करून पुरण्यात आले होते.
दरम्यान, हिंदू स्मशानभूमीतून अस्थिकलश गायब झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकले. हिंदू स्मशानभूमीच्या एकंदर भोंगळ कारभाराची पोलखोल या वृत्तात ‘लोकमत’ने केले. त्यामुळे अमोल नागपूरकर यांनीही आपल्या नवजाताचा मृतदेह सुरक्षित आहे काय, याची खातरजमा करून घेण्यासाठी दफनभूमी गाठली. यावेळी त्यांनी पुरलेल्या नवजाताचा खड्डा संपूर्ण उखरल्याचे व खड्ड्यातील मृतदेह गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
काळजाच्या तुकड्याची अशी अवहेलना झाल्याने अमोल नागपूरकर यांनी तात्काळ हिंदू स्मशानभूमी प्रशासनाशी संपर्क साधून आपला संताप व्यक्त केला. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांना पाचारण करण्यात आले. ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. मात्र, ही हद्द राजापेठ ठाण्याची असल्याने त्यांना माहिती देण्यात आली. राजापेठ ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अमोल नागपूरकर हे तक्रार देण्यासाठी ठाण्यात दाखल झाले; मात्र वृत्त लिहिस्तोवर तक्रार देण्यात आली नव्हती. या घटनेची चर्चा शहरात वाºयासारखी पसरली.

मागील बाजू खुली
दफनभूमीची मागील बाजू मात्र पूर्णत: खुली आहे. या सुरक्षा भिंतीचे भिजत घोंगडे कायम आहे. हिंदू स्मशान संस्थेकडून ही महापालिकेची जबाबदारी असल्याचे सांगून हात वर करण्यात आले आहे.  

दरमहा ५० दफनविधी
गणेश कॉलनीमागील या दफनभूमीत दरमहा ५० च्या जवळपास दफनविधी होतात. एप्रिल ते आतापर्यंत ४९ दफनविधी झाल्याची माहिती पुढे आली आहे.

‘तो’ अस्थिकलश अद्यापही बेपत्ता!
मसानगंज येथील रहिवासी विजय नारायणदास राय (६२) यांच्यावर हिंदू स्मशानभूमीत २८ एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात आला. ३० एप्रिल रोजी तिसºया दिवसानिमित्त नातेवाइकांनी स्मशानभूमीत विधिवत पूजन केले व अस्थी गोळा करून कलश ठेवला. तो अस्थिकलश तेव्हापासून बेपत्ता आहे. यासंदर्भात २ मे रोजी मृताचे बंधू राजू राय यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविली होती. स्मशानभूमीतून अस्थिकलशाची विक्री केली जात असून, गुप्तधन वा अघोरी पूजेसाठी त्याचा वापर केला जात असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. स्माशानभूमीत कार्यरत भुºया नामक कर्मचाºयाकडून त्यांना यासंदर्भाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.

प्रेतास सुरक्षितरीत्या दफन करण्याची जबाबदारी नातेवाइकांची आहे. जोपर्यंत महापालिकेकडून भिंत तयार होत नाही, तोपर्यंत दफन केलेल्या जागेवर त्यांनी रीतसर परवानगी घेऊन ओटा बांधावा.
- राजेश हेडा, कोषाध्यक्ष, हिंदू स्मशान संस्था, अमरावती.

Web Title:  Burial buried in the graveyard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस