‘संभाजीनगर’च्या फलकाने सुटली बसफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:11 AM2021-01-14T04:11:51+5:302021-01-14T04:11:51+5:30

फोटो - १३ एस मनसे, १३ एस चांदूर रेल्वे मनसे आक्रमक, चांदूर बाजार आगारात धडक, चांदूर रेल्वेतही आंदोलन आसेगाव ...

Bus departure with 'Sambhajinagar' sign | ‘संभाजीनगर’च्या फलकाने सुटली बसफेरी

‘संभाजीनगर’च्या फलकाने सुटली बसफेरी

Next

फोटो - १३ एस मनसे, १३ एस चांदूर रेल्वे

मनसे आक्रमक, चांदूर बाजार आगारात धडक, चांदूर रेल्वेतही आंदोलन

आसेगाव पूर्णा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबादच्या फेरीवर असलेल्या चांदूर बाजार-औरंगाबाद बसचे परतवाडा बस स्थानकावर फलक बदलवून ‘संभाजीनगर’ केले. पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बस याच फलकाने पुढे गेली. मनसेने २६ जानेवारीपूर्वी औरंगाबाद शहराचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर' करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी बसला छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करीत ‘संभाजीनगर’ असे फलक लावले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राज पाटील, जिल्हा सचिव अक्षय काजे, जिल्हा उपाध्यक्ष प्रीतेश अवधड, अचलपूर तालुका उपाध्यक्ष विजय पोटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विवेक महल्ले, जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी सेना सचिन जिस्कार, अचलपूर तालुका उपाध्यक्ष सागर डांगे, परतवाडा शहराध्यक्ष दिलीप गुलरक, अचलपूर शहराध्यक्ष देवराव केदार, महानगर अध्यक्ष दिनेश पवार, चांदूर बाजार तालुकाध्यक्ष आदित्य खुळे, तालुका उपाध्यक्ष अक्षय घुलक्षे, मनविसे तालुकाध्यक्ष अक्षय गुर्जर, मनविसे तालुका उपाध्यक्ष वैभव कोरडे, रोशन धांडे, चेतन चौधरी, रूपेश शर्मा, गौरव अमझरे, अभय गोवारे, पंकज पर्वतकर, पार्थ भुजबळ, मंगेश आवनकर उपस्थित होते.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांदूर रेल्वे आगारात सोमवारी चांदूर रेल्वे-औरंगाबाद बसचे बोर्ड काढून ‘छत्रपती संभाजीनगर’ असे फलक लावले आणि छत्रपति संभाजी महाराज्यांच्या नावाने जयघोष केला. यावेळी शहर अध्यक्ष वरदान इंगोले, शहार सचिव रीतेश देशमुख, कार्याध्यक्ष दर्शन इंद्रवणे, ओमप्रकाश मानकर, हर्षल देशमुख, संदीप मेश्राम , मंगेश ठाकरे, दिनेश जगताप, मनविसेचे प्रतीक सवाने, रोहित इंगोले, प्रसाद मेटे, अक्षय हटवार आदी उपस्थित होते.

Web Title: Bus departure with 'Sambhajinagar' sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.