दुप्पट्टा टाकून केले जाते बसमध्ये आरक्षण
By admin | Published: February 9, 2017 12:15 AM2017-02-09T00:15:33+5:302017-02-09T00:15:33+5:30
जिल्हयातील सर्व आगारात व बसस्थानकात बस आली की, दुप्पट्टा टाकून नियमबाह्य आरक्षण करण्याची पद्धत आहे. त्यामुळे कुठल्याही बसवर प्रवाशांची झुंबड उडते.
अपघात होण्याची शक्यता : चालक- वाहकांची मूक संमती
संदीप मानकर अमरावती
जिल्हयातील सर्व आगारात व बसस्थानकात बस आली की, दुप्पट्टा टाकून नियमबाह्य आरक्षण करण्याची पद्धत आहे. त्यामुळे कुठल्याही बसवर प्रवाशांची झुंबड उडते. दुप्पट्टा टाकून सिटचे आरक्षण केले जाते. यामुळे अनेकदा किरकोळ जखमी झाल्याच्याही घटना आहे. या प्रकारामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चालक - वाहकांच्या डोळयासमोर हा प्रकार होतो. पण चालक -वाहक नागरिकांना हटकण्याचीही तसदी घेताना दिसून येत नाही.
अमरावती जिल्हयात ४५० च्यावर एसटी बसेस आहेत. त्याच्या हजारो फेऱ्या रोज अमरावती आगारातून होतात. त्यामुळे अमरावती आगारात रोज प्रवाश्यांचे यात्रेचे स्वरुप राहते. पण मात्र शिस्तीत नागरिक बसमध्ये चढत नाहीत. आपल्या बसमध्ये जागा मिळाली पाहिजे याकरीत, काही तरुण वर्ग तसेच महिला सुध्दा दुप्पट्टा टाकून सिटीचे आरक्षण करतात. त्यामुळे अनेक वृद्धांना बसमध्ये उभे राहण्याची वेळ येते.
अनेक जण आपल्या जवळ असलेली बॅग व इतर साहित्य टाकू न आरक्षण करतात. अनेकांना नियमात चढूनही जागा मिळत नसल्याने त्यांची अनेकांशी वाद होतात. बसमध्ये सीटच्या मागे एसटी महामंडाच्या वतीने लिहलेले असते. की महिलांकरीता राखीव, अपंग, वृध्दांकरीता, माजी सैनिकांकरीता राखीव असे लिहलेले असते. पण हे आरक्षण फक्त नावापुरतेच राहले आहे. याची अंमलबजावणीही होत नाही. व अश्या लोकांना आपल्या अधिकारांची जाणीवही नसते. प्रवाशी दुप्पट्टा व ईतर साहित्य टाकून आरक्षण करतात हे नियमबाह्य आहे. यावर जिल्हा नियंत्रकांनी कारवार्इंचे आदेश दिले तर अश्या प्रकाराला आळा बसू शकते. पण अश्या प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे अधिकारी करतात तरी काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो. रांगेत शिस्तीत बसमध्ये चढणे अपेक्षित आहे. पण नागरिकांनी स्वयंभू पध्दती पाडल्या आहेत. परंतु इतर प्रवाश्यांना याचा त्रास सहन करावा सहन करावा लागतो.