व्यापारी संघटनांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:22 PM2018-09-28T22:22:25+5:302018-09-28T22:23:15+5:30

देशातील आॅनलाइन शॉपिंगच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. व्यापारक्षेत्रात नव्याने उतरणाऱ्या विदेशी कंपन्यांना अटकाव करण्याच्या मागणीसाठी २८ सप्टेंबर रोजी कडकडीत बंद पाळला. कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सच्या नेतृत्वातील विविध व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठवून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

The business associations are stained with rubbish | व्यापारी संघटनांचा कडकडीत बंद

व्यापारी संघटनांचा कडकडीत बंद

Next
ठळक मुद्देसरकारच्या धोरणाचा निषेध : आॅनलाईन मार्के टिंगला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देशातील आॅनलाइन शॉपिंगच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. व्यापारक्षेत्रात नव्याने उतरणाऱ्या विदेशी कंपन्यांना अटकाव करण्याच्या मागणीसाठी २८ सप्टेंबर रोजी कडकडीत बंद पाळला. कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सच्या नेतृत्वातील विविध व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठवून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.
चिल्लर व्यापार व ई कॉमर्समध्ये विदेशी गुंतवणुकीला परवानगी देवू नये, सिंगल बॅ्रन्ड रिटेलमध्ये शंभर टक्के परवानगी परत घेण्यात यावी, जीएसटीमध्ये केवळ दोन प्रकारचे करदर ठेवण्यात यावे, जीएसटी नोंदणीबध्द व्यापाºयांना उत्तरप्रदेशच्या धर्तीवर दहा लाख रुपयांचा अपघात विमा, देशात बाजारशुल्क बंद करावा, आयात करामधील सवलतीची मर्यादा पाच लाख करण्यात यावी, कलम ८० सी.के. अंतर्गत सवलतीची मर्यादा १.५ वरून २.५ लाख करण्यात यावी, अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत कमाल दंड दहा हजार असावा, दगड व लाकडावर वनविभागामार्फत लावण्यात येणारा कर रद्द करावा, व्यापाºयांना कमी व्याजदरात कर्जपुरवठा, कलम ४११ व ४१२ मध्ये असलेली अटकेची तरतूद रद्द करावी, आॅनलाइन फार्मासीवर प्रतिबंध आदी मागण्यांसाठी व्यापारी संघटनांनी बंद पुकारला होता. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधानाना निवेदन पाठवून न्याय देण्याची मागणी विविध व्यापारी संघटनांनी केली.
यावेळी कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष बी.सी. भरतीया, श्माम शर्मा, बवन भुतडा, आत्माराम पुरसवाणी, सुरेश जैन, घनश्याम राठी, जयंत कामदार, प्रकाश बोके, सुरेश बतरा, परशराम अग्रवाल, सुरेश बतरा, सचिन जोशी, माणिकचंद लुल्ला, गौरीशंकर हेडा अतुल कळमकर, महेश खासबागे, अशोक तिवलकर, राजेश चावंडे, पंकज वस्ताणी, संतोष मालवीय, सुरेश खटलोया, अनिल देवलसी, अमित अग्रवाल यांच्यासह विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
ई-फार्मसीच्या निषेधार्थ औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद
केंद्र सरकारने इंटनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री व ई- फॉर्मासी धोरणाच्या विरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी शुक्रवारी बंद पुकारला होता. अमरावती शहर व जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळला. जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशने जिल्हाधिकारी, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त आदींना मागणीचे निवेदन दिले. यात केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सौरभ मालाणी, सचिव प्रमोद भरतीया, उपाध्यक्ष संजय शेवळे व पदाधिकारी व अन्य सहभागी झाले होते.

Web Title: The business associations are stained with rubbish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.