बिझीलॅंड, सिटीलॅन्ड व्यापारी संकुलावर ३५ शिक्षक ठेवणार लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:11 AM2021-05-24T04:11:44+5:302021-05-24T04:11:44+5:30

अमरावती : नजीकच्या बिझीलँड, सिटीलँड या व्यापारी संकुलावर लक्ष्य ठेवण्यासाठी महसूल विभागाने अमरावती पंचायत समिती अंतर्गत १६ शिक्षकांची नियुक्ती ...

Busyland, Cityland Merchant Complex to target 35 teachers | बिझीलॅंड, सिटीलॅन्ड व्यापारी संकुलावर ३५ शिक्षक ठेवणार लक्ष्य

बिझीलॅंड, सिटीलॅन्ड व्यापारी संकुलावर ३५ शिक्षक ठेवणार लक्ष्य

Next

अमरावती : नजीकच्या बिझीलँड, सिटीलँड या व्यापारी संकुलावर लक्ष्य ठेवण्यासाठी महसूल विभागाने अमरावती पंचायत समिती अंतर्गत १६ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कठोर संचारबंदी लागू असताना या संकुलातील दुकाने सुरू राहत असल्याबाबतच्या तक्रारीनुसार तहसीलदार संतोष काकडे यांनी शिक्षकांकडे जबाबदारी सोपविली आहे.

२४ ते ३१ मे दरम्यान सकाळी ९ ते २ आणि दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजता दरम्यान दाेन पाळीत बिझीलँड, सिटीलॅन्ड व्यापारी संकुलावर ३५ शिक्षकांना कर्तव्य बजवावे लागणार आहे. बिझीलँड व्यापारी संकुलात पर्यवेक्षक राजू दंडाळे यांच्या मार्गदर्शनात राजेंद्र देवरे (पार्डी), सचिन अवघड (मोगरा), अभय मुळे (उतखेड, प्रवीण मांडसे (हातला), मनोज ओकटे (पुसदा), संजय गेडाम (पार्डी), विनोद कुऱ्हेकर (पार्डी), अनिल जाधव (मोगरा), राजू खारकर (उतखेड), भास्कर दाभाडे (पुसदा), सुधीर भोळे (माेगरा) हे शिक्षक लक्ष्य ठेवतील. सिटीलँड व्यापारी संकुलावर पर्यवेक्षक ज्ञानेश्र्वर गावनेर यांच्या मार्गदर्शनात प्रमोद कडू (रोहनखेडा), ईकबाल अहमद (पुसदा), उमेश उदापुरे (करजगाव), प्रमोद घाटोळे (दस्तापूर), शाम पाटील (रोहनखेडा), विनोद ईसळ (अंतोरा), विजय उभाळ (फाजलापूर), नरेश ब्राम्हण (करजगाव), नरेंद्र सुखदेवे (जामडोल), राजदीप गुडधे (कस्तुरा), तर ड्रीमलँड व्यापारी संकुलावर पर्यवेक्षक विशाल धोटे यांच्या मार्गदर्शनात दिलीप गोबरे (पिंगळाई), रवींद्र रोकडे (कांमुजा), फारूख मो. सलिम (कामुंजा), मो. सादिक शेख बशीर (शेवती), विजय लव्हाळे (रोहणखेडा), विनोद भगत (रेवसा), गजानन व्यवहारे (आमला), फारूख अहेमद खाँ (कामुंजा), जाहीर खान सत्तार खान (शेवती), धनराज कुचे (अंतोरा) हे शिक्षक लक्ष्य ठेवणार आहेत.

Web Title: Busyland, Cityland Merchant Complex to target 35 teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.