मुदतवाढीनंतर ७४ हजार क्विंटल तूर खरेदी
By admin | Published: May 21, 2017 12:04 AM2017-05-21T00:04:36+5:302017-05-21T00:04:36+5:30
तूर खरेदी केंद्रांना ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर शासनाने चार हजार १५१ शेतकऱ्यांची ७४ हजार ४० क्विंटल तूर खरेदी केली आहे.
केंद्रांची सद्यस्थिती: १२ हजार शेतकऱ्यांना टोकन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तूर खरेदी केंद्रांना ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर शासनाने चार हजार १५१ शेतकऱ्यांची ७४ हजार ४० क्विंटल तूर खरेदी केली आहे. ११ हजार ८९३ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहेत. अद्याप एक लाख ८८ हजार पोते यार्डात पडून आहेत.
केंद्रांना मुदतवाढीच्या निर्णयानंतर नाफेडव्दारा आज तारखेपर्यंत ४ हजार १५१ शेतकऱ्यांची ७४ हजार ४० क्विंटल तूर खरेदी केली आहे. यामध्ये चांदूरबाजार केंद्रावर ६९४ शेतकऱ्यांची १२,९९० क्विंटल चांदूररेल्वेला ३४० शेतकऱ्यांची ५,४०३ क्विंटल, दर्यापूर केंद्रावर २२३ शेतकऱ्यांची ४,७८७ क्विंटल, धामणगाव केंद्रावर ६९० शेतकऱ्यांची १०,४३९ क्विंटल, मोर्शी केंद्रावर १४७ शेतकऱ्यांची २,९४३ क्विंटल.
नांदगाव केंद्रावर २३६ शेतकरयांची ५,०२९ क्विंटल, तिवसा केंद्रावर ४० शेतकऱ्यांची ५९८ क्विंटल,व वरुड केंद्रावर ७५१ शेतकऱ्यांची ११,९७५ क्विंटल तूर नाफेदव्दारा खरेदी करण्यात आली आहे.
शुक्रवारी या सर्व ११ ही केंद्रावर ९२६ शेतकऱ्यांची १५,७२८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये अचलपूरला २२४५ क्विंटल, अमरावती १०४४, अंजनगाव १३६१, चांदूरबाजार १४५०, चांदूररेल्वे ११९८, दर्यापूर ११४२, धामणगाव रेल्वे ३०१४, मोर्शी ९२१, नांदगाव १११९, तिवसा २०४६ व वरूड केंद्रावर १८६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.
बाजार समितीच्या फोननंतर आणावी तूर
शेतकऱ्यांनी तूर विक्रीला आनन्यापूर्वी बाजार समिंतीमध्ये सातबारा, पिकपेरा, आधारकार्ड झेरॉक्स,यापूर्वी तूर विकली बाजार समितीचे नाव, विक्री तपसील,भ्रमनध्वनी क्रमांक, बँक खाते तपशील दिल्यानंतर शेतकऱ्याला टोकन देण्यात येईल. क्रमवारीनुसार ज्यावेळी नंबर येईल त्यावेळी बाजार समितीव्दारा फोन करण्यात येईल. त्यावेळी शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणावी, संभाव्य पावसापासून नुकसान होणार नाही व बाजार समित्यांमधील गर्दी कमी होईल, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी केले आहे.
११ हजार शेतकऱ्यांना दिले टोकन
सद्यस्थितीत सर्वच केंद्रावर ११,८९३ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहे. यामध्ये अचलपूर १,४१३, अमरावती १,८२३, अंजनगाव सुर्जी१, ३७८, चांदूरबाजार ७०९, चांदूररेल्वे, ५८४,दर्यापूर १,२८१, धामणगाव रेल्वे ८६३, मोर्शी १,०२४, नांदगाव खंडेश्वर १,१२४, तिवसा ३७५, वरुड १,२८२ व धारणी केंद्रावर ३३ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहे.