पणन करणार १२ केंद्रांवर सोयाबीनची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:35 PM2017-10-26T23:35:03+5:302017-10-26T23:35:14+5:30

जिल्ह्यात पणन विभागातर्फे १२ केंद्रांवर सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. यापैकी धामणगाव केंद्रांवर २९ शेतकºयांचे ७१५ क्विंटल सोयाबीन खरेदी गुरुवारी करण्यात आली.

 Buy soybean at 12 centers on marketing | पणन करणार १२ केंद्रांवर सोयाबीनची खरेदी

पणन करणार १२ केंद्रांवर सोयाबीनची खरेदी

Next
ठळक मुद्देधामणगावात खरेदीला सुरुवात : जिल्हा उपनिबंधकांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात पणन विभागातर्फे १२ केंद्रांवर सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. यापैकी धामणगाव केंद्रांवर २९ शेतकºयांचे ७१५ क्विंटल सोयाबीन खरेदी गुरुवारी करण्यात आली. ग्रेडरसंदर्भातील समस्या निकाली निघाली असून, शेतकºयांना सूचना देऊन सोयाबीनची खरेदी करण्यात येईल. प्रतवारीनुसार दरासंदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागविले असल्याचे जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी सांगितले.
नाफेड केंद्रांवर आॅनलाइन नोंदणी झालेली असतानाही प्रत्यक्ष सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. यादरम्यान जिल्ह्यातील दोन लाख क्विंटल सोयाबीन बाजार समित्यांमध्ये हमीपेक्षा कमी भावाने विकले गेल्याने शेतकºयांना किमान १५ कोटींचा फटका बसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध झाले. या वृत्तानंतर सोयाबीन खरेदीसंदर्भात ग्रेडरची समस्या निकाली काढून केंद्रांना सूचना देण्यात आल्यात. पणन विभागानेदेखील केंद्रावर सोयाबीनसह मूग व उडीद विक्रीसाठी आणताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले. शेतकºयांनी नोंदणी करण्यासाठी सातबारा, आधार कार्ड व बँक पासबूकची झेरॉक्स, स्पेसीफिकेशनप्रमाणे एफएक्यू प्रतीचा व चाळणी मारून माल आणावा. यामध्ये कमाल आर्द्रता मर्यादा १२ टक्क्यांपर्यत असावी. शेतमालाच्या खरेदीनंतर शेतकºयांच्या थेट बँक खात्यात एका आठवड्याच्या आत रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात १,८९७ शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी
नाफेडच्यावतीने खरेदी करण्यात येणाºया शेतमालासाठी १२ केंद्रांवर १,८९७ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली. यामध्ये मुगासाठी ५९०, सोयाबीनसाठी ६४७, तुरीसाठी २७३ व उडिदासाठी ३८७ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. सोयाबीनसाठी अचलपूर १४४, अमरावती ७५, अंजनगाव सुर्जी ९, चांदूर बाजार १०, चांदूर रेल्वे १८७, धामणगावरेल्वे १९८, मोर्शी १६, नांदगाव खंडेश्वर ७९ तिवसा १६ व वरूड केंद्रावर ४ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे.

Web Title:  Buy soybean at 12 centers on marketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.