टोकन दिलेली तूर खरेदी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 11:45 PM2017-10-27T23:45:14+5:302017-10-27T23:45:40+5:30
शासकीय खरेदीसाठी जिल्ह्यात टोकन दिल्यानंतर लाखभर व अमरावती बाजार समिती अंतर्गत ३९ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात यावी, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासकीय खरेदीसाठी जिल्ह्यात टोकन दिल्यानंतर लाखभर व अमरावती बाजार समिती अंतर्गत ३९ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन बाजार समिती सभापती प्रफुल्ल राऊत यांनी गुरुवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे दिले. यांसह अन्य मागण्याही त्यांनी निवेदनात मांडल्या.
ढगाळ वातावरण लक्षात घेता शासनाचे आदेशान्वये शेतकºयांना टोकन व लॉट नंबर देऊनही तुरी घरीच ठेवण्याचे सांगण्यात आले. दरम्यान ३१ मेपर्यंत शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली व नंतर खरेदी केंद्रच बंद करण्यात आले. त्यामुळे १६०० शेतकºयांची टोकन दिलेली तूर खरेदी करण्यात आलेली नाही. याबाबत बाजार समितीद्वारा वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला असतानाही शासनाद्वारे कळविण्यात आलेले नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आला असल्याने टोकन दिलेली तूर खरेदी करण्यात यावी, अशी मागणी राऊत यांनी केली.
यावेळी उपस्थित आ. यशोमती ठाकूर यांनीही जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याविषयीची माहिती सहकारमंत्र्यांना देऊन चर्चा केली.
कोल्ड स्टोरेज उभारणीसाठी निधी मिळावा
जिल्ह्यासह विभागातील शेतमाल अमरावती बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येतो व खरेदी केलेला शेतमाल परराज्यात पाठविला जातो. यामध्ये शेतकºयांचा भाजीपाला, फळे व तेलबियांचा माल असतो.मात्र, येथे कोल्ड स्टोरेजची सुविधा नसल्याने नाशवंत मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे बाजार समितीच्या मार्केट यार्डात २०० एमटी क्षमतेच्या वातानुकूलित शीतगृह उभारणीस शासनाने निधी उपलब्ध करावा, अशी मागणी राऊत यांनी निवेदनाद्वारे केली.