दार ‘नॉक’ केल्याने वाचली तिची अब्रू!

By प्रदीप भाकरे | Published: March 5, 2023 04:09 PM2023-03-05T16:09:14+5:302023-03-05T16:09:30+5:30

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला वाईट उद्देशाने एका गोडाऊनमध्ये नेण्यात आले.

By 'knocking' the door, her shame was saved! | दार ‘नॉक’ केल्याने वाचली तिची अब्रू!

दार ‘नॉक’ केल्याने वाचली तिची अब्रू!

googlenewsNext

अमरावती :

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला वाईट उद्देशाने एका गोडाऊनमध्ये नेण्यात आले. तेथे त्याने तिला अश्लिल मागणी देखील केली. मात्र तेवढ्यात दारावर कुणीतरी नॉक केल्याने आरोपी घाबरला. त्याने तिला खिडकीतून बाहेर ढकलून दिले. ३ मार्च रोजी सकाळी ७ च्या सुमारास नवीन बडनेरा भागात ही घटना घडली. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी ४ मार्च रोजी दुपारी आरोपी मोहम्मद एहफान मोहम्मद अकील (२०, रा. जुनीवस्ती, बडनेरा) याच्याविरूध्द अपहरण, विनयभंग व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, यातील अल्पवयीन मुलगी ही आरोपीला दोन महिन्यांपासून ओळखते. काही दिवसांपुर्वी तो तिच्या शाळेजवळील दुकानात येऊन तिच्याशी बोलला होता. मला तू आवडतेस. माझे सोबत मैत्री करते का, अशी विचारणा त्याने केली. त्यावर तिने होकार भरला असता, तो रोजच तिच्या शाळेत तिला भेटायला येऊ लागला. ३ मार्च रोजी सकाळी ती शाळेत जात असतांना आरोपी हा त्याचा ऑटो घेऊन आला. मला तुझ्यासोबत बोलायो आहे. माझ्यासोबत चल, असे म्हणून त्याने तिचे अपहरण केले. तिला एका पांढ-या रंगाच्या टेम्पोमध्ये बसवून तो तिला नवीन बडनेरा भागातील एका गोडाउनमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिच्याकडे अश्लिल मागणी केली.

तिचा विनयभंग केला. तेवढ्यात काही लोक गोडाऊनबाहेर आले. ते जोरजोरात गोडाऊनचे दार वाजवू लागले. त्यामुळे आपण पकडले जाऊ या भीतीने तो गर्भगळीत झाला. त्याने अपहृत मुलीला खिडकीतून बाहेर उडी मारण्यास सांगितले. तिने नकार दिला असता, आरोपी मो. एहफानने तिला खिडकीतुन खाली ढकलून दिले. त्यामुळे तिच्या डोक्याला व पाठीला मार लागला. हा प्रकार समजताच दोन गट पोलीस ठाण्याबाहेर एकत्र आले होते. मात्र पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल करून कायदा, सुव्यवस्था बिघडू दिली नाही.

Web Title: By 'knocking' the door, her shame was saved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.