१२५ ग्रामपंचायतीत जूनमध्ये पोटनिवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:38 PM2019-05-20T22:38:58+5:302019-05-20T22:39:12+5:30
जिल्ह्यात १२५ ग्रामपंचायतींच्या १६६ प्रभागातील रिक्त असलेल्या १८९ सदस्यपदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केला. २२ मे रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होणार आहे, तर २३ जूनला मतदान होईल. संबंधित निवडणूक क्षेत्रात २४ जूनपर्यंत आचारसंहिता लागू झालेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात १२५ ग्रामपंचायतींच्या १६६ प्रभागातील रिक्त असलेल्या १८९ सदस्यपदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केला. २२ मे रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होणार आहे, तर २३ जूनला मतदान होईल. संबंधित निवडणूक क्षेत्रात २४ जूनपर्यंत आचारसंहिता लागू झालेली आहे.
जुलै ते सप्टेंबर २०१९ या दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व तसेच रिक्त सदस्यपदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. जिल्ह्यात या कालावधीत एकाही ग्रामपंचायतीची मुदत संपत नसली तरी रिक्त सदस्यपदे असल्याने जिल्हा निवडणूक विभागाने या विषयीचा अहवाल आयोगाला सादर केला होता. त्यानुसार मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात आला. सोमवारी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दुपारी राज्य निवडणूक आयोगाद्वारे पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.
पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्जाची प्रक्रिया आॅनलाइन राहणार आहे. निवडणुकीचे नियंत्रण व पर्यवेक्षणाची जबाबदारी विभागीय आयुक्तांकडे राहणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्तीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. २३ जून रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदानाची प्रक्रिया राहील. २४ जूनला जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने संबंधित तहसीलदार तालुक्याच्या मुख्यालयी मतमोजणीचे ठिकाण व वेळ निश्चित करणार आहेत.
दोन महिन्यांपासून लागू असलेली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता गुरुवारी संपुष्टात येत असतानाच जिल्ह्यातील १२५ ग्रामपंचायतींमधील विकासकामांना पुन्हा खीळ बसणार आहे.
उमेदवारी अर्जासोबत ही कागदपत्रे आवश्यक
उमेदवाराना संगणकीय प्रणालीद्वारेच उमेदवारी अर्ज भरावा लागेल. उमेदवारी अर्ज दाखळ करतेवेळी उमेदवारी अर्ज, मत्ता व दायित्व तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतचे घोषणापत्र, आवश्यक प्रमाणपत्राच्या सत्यप्रती, जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर केल्याची पावती व हमीपत्र ही कागदपत्रे सादर करावी लागतील