सीटी स्कॅनसाठी कॉल... अपघातग्रस्ताची मृत्यूशी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 10:07 PM2018-12-02T22:07:31+5:302018-12-02T22:07:45+5:30

डोक्याला मार लागल्याने सीटी स्कॅनसाठी परिचारिकांनी संबंधित कर्मचाऱ्याला कॉल केला. मात्र, अर्ध्या तासापर्यंत सीटी स्कॅन न झाल्याने तो तरुण मृत्यूशी झुंज देत होता. जिल्ह्याच्या आरोग्याची धुरा वाहणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हा जीवघेणा प्रकार रविवारी उघडकीस आला.

Call for CT Scan ... Contagion of Death Accidental Death | सीटी स्कॅनसाठी कॉल... अपघातग्रस्ताची मृत्यूशी झुंज

सीटी स्कॅनसाठी कॉल... अपघातग्रस्ताची मृत्यूशी झुंज

googlenewsNext
ठळक मुद्देइर्विनमधील कारभार : अर्जुननगर चौकात चारचाकीवर दुचाकीस्वार धडकला

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : डोक्याला मार लागल्याने सीटी स्कॅनसाठी परिचारिकांनी संबंधित कर्मचाऱ्याला कॉल केला. मात्र, अर्ध्या तासापर्यंत सीटी स्कॅन न झाल्याने तो तरुण मृत्यूशी झुंज देत होता. जिल्ह्याच्या आरोग्याची धुरा वाहणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हा जीवघेणा प्रकार रविवारी उघडकीस आला.
शहरातील अर्जुननगर चौकात दुपारी अडीच वाजता वळण घेणाºया चारचाकीवर दुचाकीस्वार धडकला. अर्जुननगरातील रहिवासी रोहित हेमंत मुखरे (२६) आपल्या कुटुंबीयांना घेऊन रविवारी दुपारी २.३० वाजता एमएच २७ बीई ८४६० क्रमांकाच्या चारचाकीने अर्जुननगराकडे वळण घेत होता. त्याचवेळी पंचवटी चौकाकडून नागपूर रोडकडे मनोज रमेश मेश्राम (२७) एमएच २७ बीयू ५७७३ क्रमांकाच्या दुचाकीने भरधाव निघाला होता. थोड्याशा दुर्लक्षामुळे क्षणातच मनोजची दुचाकी चारचाकीला मागून धडकली. या अपघातात हा रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून होता. बघ्यांची गर्दी जमली होती. मात्र, त्या मार्गाने जाणाºया शुभम थोरात (रा. वडगाव माहुरे) या तरुणाने माणुसकी म्हणून मदतीचा हात देत मनोजला इर्विन रुग्णालयात आणले.
तत्पूर्वी, अमरावतीवरून वडगाव माहुरेकडे त्याच मार्गाने दुचाकीवर बहिणीला बसून घेऊन जाणाºया शुभम थोरातचे लक्ष बघ्यांची गर्दीवर गेले. काय झाले अन काय नाही, ही उत्सुकता असताना तो लगेच थांबला आणि त्याचे लक्ष रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या जखमीकडे गेले. त्याला कोणी उचलून रुग्णालयात नेत नसल्याचे पाहून शुभमचे मन हळहळले. आपण यापूर्वी अनेक अपघातग्रस्तांना मदत केल्याची आठवण शुभमला झाली आणि त्याने लगेच जखमी मनोजला उचलून रुग्णालयात नेण्याची तयारी दर्शविली. आॅटोरिक्षा थांबविण्याचे प्रयत्न केले, मात्र, जखमीला रुग्णालयात न्यायला कोणी तयार नव्हते. अखेर एक आॅटोचालक तयार झाला आणि शुभमने आपल्या बहिणीला अर्जुननगर चौकात थांबवून जखमी मनोजला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी करून उपचार सुरु झाले. मात्र, त्यानंतरही सीटी स्कॅन आणि न्यूरोसर्जनसाठी घोडे अडले होते.
ओळख पटविणे झाले होते कठीण
अपघातानंतर जखमीची ओळख पटविण्याचा पेच पोलिसांना पडला होता. जखमीचा मोबाइलसुद्धा गहाळ झाला होता. दरम्यान, शुभम थोरात याने परिचयातील व्यक्तींना कॉल करून जखमीच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. त्यानंतर इर्विन चौकातील पोलीस कर्मचारी गवई यांनी मनोजच्या बहिणीशी संवाद साधून त्यांना रुग्णालयात बोलावून घेतले.

नियमित वेळेत सीटी स्कॅनसाठी कर्मचारी असतात. सुट्टी किवा अवेळी रुग्ण आल्यास आॅन कॉल ड्युटी असते. कॉल करून सीटी स्कॅन करणाºयांना बोलाविले जाते.
- श्यामसुंदर निकम
जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Call for CT Scan ... Contagion of Death Accidental Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.