मतदार यादी पुनरीक्षणासाठी ९ जून ते ३१ जुलैपर्यंत अभियान
By admin | Published: June 5, 2014 11:42 PM2014-06-05T23:42:23+5:302014-06-05T23:42:23+5:30
लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदानापासून वंचित राहण्याची वेळ हजारो मतदारांवर आली होती. ही चूक पुन्हा विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने
अमरावती : लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदानापासून वंचित राहण्याची वेळ हजारो मतदारांवर आली होती. ही चूक पुन्हा विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना पुन्हा संधी दिली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून मतदार यादी पुनरीक्षण, नवीन मतदार नोंदणीचे विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. ९ जून ते ३१ जुलै २0१४ पर्यंत हे अभियान सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत सांगितले.
लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदार यादीत नाव नसल्यामुळे हजारो मतदारांना त्याचा घटनात्मक अधिकार बजावता आला नाही. यामुळे अनेक मतदारसंघात वादावादीचे प्रसंग उद्भवले. मतदारांना नाराज होऊन घरी परतावे लागले. जिल्हाधिकार्यांपासून आयोगापर्यंत अनेक तक्रारी झाल्यात. या सार्या प्रकाराची गंभीर दखल आयोगाने घेतली. ज्यांची नावे वगळली गेली आहेत. अशा सर्व मतदारांना व नवीन मतदारांना नाव नोंदणी करण्याची पुन्हा संधी देण्यात आली आहे. २१ व २२ जून तसेच २८ व २९ जून रोजी विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली. पत्रपरिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रवींद्र धुरजड उपस्थित होते. (प्रतिनिधी)
९ जून ते ३१ जुलैपर्यंत अभियान
अमरावती जिल्ह्यात ९ जूनपासून विशेष मतदार नोंदणी अभियान सुरु करण्यात येणार आहे. ते ३१ जुलै २0१४ पर्यंत राहणार आहे. या मोहिमेत पूर्वीच्या यादीमधून ज्यांची नावे वगळली आहेत त्यांना आपली नावे पुन्हा समाविष्ट करता येणार आहे. याशिवाय १ जानेवारी २0१४ रोजी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाली आहे त्यालाही नवीन नाव नोंदणी करता येणार आहे.