तूर खरेदीसाठी प्रहारचा ठिकठिकाणी डेरा

By admin | Published: May 11, 2017 12:13 AM2017-05-11T00:13:16+5:302017-05-11T00:13:16+5:30

तूर खरेदी सुरू झाल्यास १० मे रोजी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये डेरा आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेच्यावतीने देण्यात आला होता.

Camping camp for tur purchase | तूर खरेदीसाठी प्रहारचा ठिकठिकाणी डेरा

तूर खरेदीसाठी प्रहारचा ठिकठिकाणी डेरा

Next

आंदोलन : केंद्रावर तूर खरेदी सुरू, शेतकऱ्यांचा जल्लोष, तीन आठवड्यानंतर दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तूर खरेदी सुरू झाल्यास १० मे रोजी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये डेरा आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेच्यावतीने देण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील दर्यापूर, चांदूरबाजार, अचलपूर, अमरावती बाजार समितीमध्ये प्रहारचे आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात डेरा आंदोलन करण्यात आले. यानंतर बहुतांश ठिकाणी तूर खरेदी सुरळीत सुरू झाली.
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी सकाळी ११.३० वाजता प्रहारतर्फे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनातील शेतकऱ्यांचा सहभाग व संभाव्य तणावाची शक्यता पाहता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी प्रहारचे पदाधिकारी तथा बाजार समिती संचालक गजानन मोरे, संजय तट्टे, दीपक भोरे, अंकुश जवंजाळ, मोहन वानखडे, दिलीप जवंजाळ, पोपट घोडेराव, मंगेश हुड, प्रदीप आखूड, दीपक धूळधर, भास्कर मासुदकर यावेळी उपस्थित होते. या आंदोलनानंतर बाजार समिती सचिव मंगेश भेटाळू यांनी शेतकऱ्यांची २०० पोते तूर घेऊन त्यांना टोकन दिले
चांदूरबाजारमध्ये आनंदोत्सव
तूर खरेदीकरिता प्रहारतर्फे डेरा आंदोलन करण्यात आल्यानंतर तूर खरेदी सुरू करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी प्रहारचे मंगेश देशमुख, राजेश वाटाणे, तुषार पावडे, विनोद जंवजाळ, दीपक भोंगाडे, संतोष किटुकले, सरदारखाँ, मुजफ्फर हुसैन, सुभाष मेश्राम आदींची उपस्थिती होती.
मोर्शीत तहसीलदारांना निवेदन
बाजार समितीमध्ये प्रहार संघटनेव्दारा बुधवारी डेरा आंदोलन करण्यात आले. तूर खरेदीसंर्दभात तहसीलदार अनिरुध्द बक्षी यांना निवेदन देण्यात आले. ३१ मेपर्यत तूर खरेदी करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी प्रहारचे उप जिल्हाप्रमुख अनिल खांडेकर, दद्दू श्रीवास, नईम खान, गजानन काळे, विजय पाचारे, प्रवीण तट्टे आदी उपस्थित होते.

Web Title: Camping camp for tur purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.