पुन्हा परतू शकतो नरभक्षी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:07 AM2018-11-02T01:07:01+5:302018-11-02T01:07:31+5:30

सतत १२ दिवस जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा वाघोबा मध्य प्रदेशच्या पलासपानी जंगलात स्थिरावला आहे. त्याची अमरावती जिल्ह्यात परतण्याची शक्यता कमी असली तरी सावधगिरी बाळगण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Can can be returned to cannibals! | पुन्हा परतू शकतो नरभक्षी!

पुन्हा परतू शकतो नरभक्षी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : सतत १२ दिवस जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा वाघोबा मध्य प्रदेशच्या पलासपानी जंगलात स्थिरावला आहे. त्याची अमरावती जिल्ह्यात परतण्याची शक्यता कमी असली तरी सावधगिरी बाळगण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
अमरावती जिल्ह्यातून पुढे मध्य प्रदेशच्या आठनेर रेंजमधील सातपुडा पर्वतरांगांतील पलासपानी जंगलात नरभक्षक वाघ शिरल्यानंतर ३० आॅक्टोबर रोजी त्याने सकाळी ९ वाजता दोन गार्इंवर हल्ला केला. दोघींच्या मानेवर त्याच्याकडून गंभीर जखमा झाल्या. गुराख्याने आरडाओरड करताच त्याने जंगलात पळ काढला. रात्री ८ वाजता लाल रंगाच्या गाईवर हल्ला चढविताना ट्रॅप कॅमेऱ्याने त्याचे छायाचित्र टिपले. त्यामुळे तो तीन दिवसांपासून मध्य प्रदेशच्या जंगलातच असल्याचे स्पष्ट आहे. महाराष्ट्र सीमेपासून १८ किलोमीटर अंतरावर मध्यप्रदेशच्या जंगलात तो आहे. त्याची आतापर्यंत एकाच, उत्तर दिशेने वाटचाल पाहता, परतण्याची शक्यता फारच कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मेळघाटच्या जंगलात वाघ परतण्याची दाट शक्यता असल्याचा अंदाज व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक विशाल माळी यांनी वर्तविला. दुसरीकडे आठनेर रेंजमधील पलासपानी वनखंड ६४५ मध्ये दोन ते तीन वाघ असल्याने हा युवा वाघ आपला स्वतंत्र एरिया तयार करून तिथे स्थिरावण्याची शक्यता असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले, तर अनुकूलता न लाभल्यास वाघाची दिशा बदलू शकते, असे आरएफओ शंकर बारखडे यांनी सांगितले. मध्यप्रदेश व महाराष्ट्राचे वनकर्मचारी वनअधिकारी दररोज त्याचे लोकेशन घेत आहेत.

वाघ दोन ते अडीच वर्षाचा
चंद्रपूरच्या थर्मल पॉवर स्टेशन परिसरातील जंगलात २०१६ मध्ये जन्मलेल्या वाघाचे वय सध्या दोन ते अडीच वर्षे आहे.

वनाधिकाऱ्यांची बैठक, १० कॅमेरे
अमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक हरिश्चंद्र वाघमोडे यांच्या दालनात गुरुवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प उपवनसंरक्षक विशाल माळी, एनटीसीचे जयंत वडतकर, स्वप्निल सोनवणे, सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे, अशोक कविटकर, आरएफओ आशिष कोकाटे, आनंद सुरत्ने आदी वनाधिकारी, वन्यजीव संरक्षकांची बैठक झाली. मध्य प्रदेशातील वनअधिकाऱ्यांशी माहितीचे आदान-प्रदान झाले. १० कॅमेरे वाघाच्या हालचाली टिपणार असून, मोर्शी, वरूड, परतवाडा वनपरिक्षेत्रातील मध्यप्रदेश सीमेवरील गावांवर अलर्ट ठेवण्यात आला आहे.

वनाधिकाऱ्यांची बैठक, १० कॅमेरे
अमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक हरिश्चंद्र वाघमोडे यांच्या दालनात गुरुवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प उपवनसंरक्षक विशाल माळी, एनटीसीचे जयंत वडतकर, स्वप्निल सोनवणे, सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे, अशोक कविटकर, आरएफओ आशिष कोकाटे, आनंद सुरत्ने आदी वनाधिकारी, वन्यजीव संरक्षकांची बैठक झाली. मध्य प्रदेशातील वनअधिकाºयांशी माहितीचे आदान-प्रदान झाले. १० कॅमेरे वाघाच्या हालचाली टिपणार असून, मोर्शी, वरूड, परतवाडा वनपरिक्षेत्रातील मध्यप्रदेश सीमेवरील गावांवर अलर्ट ठेवण्यात आला आहे.

Web Title: Can can be returned to cannibals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ