खतांची दरवाढ रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:13 AM2021-05-20T04:13:14+5:302021-05-20T04:13:14+5:30
विक्रम ठाकरे, युवक काँग्रेसतर्फे पंतप्रधानांकडे मागणी वरूड : कोरोना व टाळेबंदीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने खतांची ...
विक्रम ठाकरे, युवक काँग्रेसतर्फे पंतप्रधानांकडे मागणी
वरूड : कोरोना व टाळेबंदीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने खतांची दरवाढ रद्द करावी, या मागणीचे निवेदन मोर्शी विधानसभा युवक काँग्रेसने तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना दिले आहे.
रासायनिक खतांची दरवाढ जवळजवळ दीड ते दुप्पटीने करण्यात आली आहे. हा निर्णय शेतकरी बांधवांच्या मुळावर आला आहे. शेती उत्पादनास आश्वासन दिल्याप्रमाणे भाव मिळत नाही. उलट शेतीपयोगी खताची दरवाढ राजरोस होत आहे. शेतकऱ्यांच्या आक्रोशाची वाट न पाहता, रासायनिक खतांची दरवाढ कमी करण्यात यावी, असे निवेदन मोर्शी विधानसभा युवक काँग्रेस, वरूड तालुका काँग्रेसतर्फे देण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबाराव बहुरूपी, शिवसेना तालुकाप्रमुख विजय निकम, मोर्शी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज इंगोले, शहरअध्यक्ष राहुल चौधरी, तालुका सेवादल अध्यक्ष नरेंद्र पावडे, अमरावती जिल्हा सेवादल महासचिव सुधाकर दोड, नगरसेवक धनंजय बोकडे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष बंटी रडके, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष कोमल पांडव, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सविता काळे, शहर महिला सेवादल अध्यक्ष रंजना मस्की, भूषण बेहरे, तुषार दंदी, अशोक कुरवाळे, शुभम कुरवाळे, विलास कुरवाळे आदी उपस्थित होते.