त्वरित निदान झाल्यास ‘कॅन्सरला कॅन्सल’ करणे शक्य

By admin | Published: April 26, 2017 12:25 AM2017-04-26T00:25:20+5:302017-04-26T00:25:20+5:30

विविध प्र्रकारच्या कर्करोगासंदर्भात लोकांच्या मनात नेहमीच भीती असते.

'Cancers Can Cancel' In Early Diagnosis | त्वरित निदान झाल्यास ‘कॅन्सरला कॅन्सल’ करणे शक्य

त्वरित निदान झाल्यास ‘कॅन्सरला कॅन्सल’ करणे शक्य

Next

कॅन्सरतज्ज्ञांची माहिती : लोकमत सखी मंच, कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलतर्फे परिसंवाद
अमरावती : विविध प्र्रकारच्या कर्करोगासंदर्भात लोकांच्या मनात नेहमीच भीती असते. परंतु, जर या आजाराचे प्राथमिक अवस्थेतच योग्य निदान झाले, तर ‘कॅन्सरला कॅन्सल’ करता येते, असा विश्वास कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ज्ञ पराग कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
लोकमत सखी मंच अमरावती व कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यामाने स्थानिक अभियंता भवनात ‘कॅन्सरला करा कॅन्सल’ या विषयावर सखी मंच सदस्यांकरिता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई येथील कॅन्सरच्या तज्ज्ञांनी कर्करोगा सारख्या गंभीर आजारावर सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. यावेळी महिला व पुरुषांनी विविध प्रकराच्या कर्करोगासंदर्भात माहिती जाणून घेतली व त्यांना अनेक प्रश्न करून डॉक्टरांनी तेवढ्याच सक्षमपणे त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी "लोकमत"चे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या प्रतिमेचे पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
व्यासपीठावर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. योगेश कुलकर्णी, रेडीओलॉजिस्ट व कॅन्सरतज्ज्ञ प्रणव चढ्ढा, आयएमआयचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉ.वसंत लुंगे, अमरावतीचे अध्यक्ष डॉ.बी.आर. देशमुख, कॅन्सरतज्ज्ञ राजेंद्रसिंह अरोरा, उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, "लोकमत" अमरावती युनिटचे संपादकीय प्रमुख गणेश देशमुख आदी उपस्थित होते.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे मार्केटिंग चीफ मॅनेजर नीलेश पहाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी संचालन संगीता रिठे यांनी केले, तर प्रास्ताविकातून संपादकीय प्रमुख गणेश देशमुख यांनी "लोकमत"ची भूमिका विशेष केली. यावेळी संचालन डॉ. संगीता रिठे आभार इव्हेंट मॅनेजर जयंत कौलगिकर व स्वाती बडगुजर यांनी मानले. यावेळी महिलांमध्ये विशेषत: भारतामध्ये सर्वायकल कॅन्सरचे प्रमाण अधिक असून अनेक महिलांना हा आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु, महिलांना आपल्या जवळच्या डॉक्टरांकडून वेळीस आरोग्याची तपासणी करवून घेतली व जर योग्य वेळीस "सर्वायकल कॅन्सर"चे (गर्भाशयाचा कर्करोग) निदान झाले तर पूर्णपणे बरा होणार आजार असून याचे निदान व योग्य उपचार घेतला तर रूग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. अनेक लोकांचे आयुष्य आपण वाढवू शकतो. तशा प्रकारे औषधोपचार व तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तसेच ज्या रुग्णांना कर्करोग आहे. त्यांनी आत्मविश्वासाने समोरे गेलो पाहिजे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी डॉ.वसंत लुंगे यांचे सहकार्य लाभले. त्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी "लोकमत"चे आभार मानले. यावेळी कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून ब्रेनट्युमर असेल व तोे अ‍ॅपरेशन करून तज्ज्ञ डॉक्टरांना काढण्यास अडचण निर्माण होत असेल तर त्याला येथील अत्याधुनिक रेडीएशनच्या सहायाने अचूक उपचार करून रुग्णांना बरे करता येते. या उपचार पद्धतीमध्ये रडिएशनद्वारा ट्यूमरच्या बाधित पेशींना "लक्ष्य" करून त्यास नष्ट केले जाते. मागील काही वर्षांत कर्करोगांचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती कॅन्सरतज्ज्ञ प्रणव चढ्ढा यांनी दिली. कॅन्सर हा कुणालाही होऊ शकतो. मात्र, आधुनिक जीवनशैलीचा शिरकाव झाल्याने महिलांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. ५० टक्के महिलांना त्रास जाणवला तरी त्या आजार अंगावर काढतात. गाठी शरीरावर आल्यावरही महिला भीतीपोटी व लाजेमुळे त्या लपवून ठेवतात. परिणामी निदान व उपचाराला उशीर होतो. महिलांना वक्षभागावर गाठ आली असल्यास ती लपवून ठेवू नये. आपल्या जवळ्याच्या स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. धकाधकीच्या आयुष्यात महिला अनेक आजाराला नकळत निमंत्रण देत आहे. चांगला आहार घ्या, घाम येईपर्यंत व्यायाम करा. तसेच जशी शरीराची काळजी घ्या, तशी महिन्यातून एकदा पाच मिनिट वेळ काढून आपल्या आरोग्याची तपासणी करावी. वर्षांतून एकदा आपल्या वाढदिवसाच्या तीन चार दिवस आधी तज्ज्ञ डॉक्टरांकडे शरीराच्या अवयवांची चाचणी करावी. महिलांमध्ये स्तन कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. यामुळे स्तनात काही गाठ नाही ना याची तपासणी करायला हवी. यासाठी डॉक्टरांकडून सल्ला घेतलाच पाहिजे, असे नाही. तसेच स्तनावर तीळ येणे, त्यातून रक्त येणे, गाठ होणे ही कॅन्सरची लक्षणे असू शकतात, यामुळे महिन्यातून एकदा स्तन तपासणी करावी, असे डॉ.योगेश कुलकर्णी यांनी सांगितले.

महिलांच्या प्रश्नावर चर्चा
यावेळी डॉ.योगेश कुळकर्णी व डॉ.प्रणव चढ्ढा यांनी उपस्थित महिला व पुरुषांच्या प्रश्नांचे व त्यांच्या मनात आलेल्या शंकांचे निरसनही केले. यावेळी कॅन्सरचे योग्य निदान झाले नसल्याने अनेकांचा जीव गेला आहे. जर वेळीच उपचार घेतला व योग्य मार्गदर्शन मिळाले तर आपण ‘कॅन्सरला कॅन्सल’ करू शकतो. यासाठी महिलांना जागृत होणे गरजेचे आहे. महिलांनी कॅन्सरच्या विरोधात लढा द्यावा, असा सूर चर्चासत्रांतून माध्यामातून मान्यवरांनी लावला.

माहिती पुस्तिकेचे वाटप
‘कॅन्सरला करा कॅन्सल’ या मार्गदर्शनपर परिसंवाद कार्यक्रमात उपस्थितांना लोकमत व कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलतर्फे आयोजित सर्व प्रकारच्या कॅन्सरबाबत माहिती असलेल्या पुस्तिकेचे वाटप यावेळी करण्यात आले आहे. तसेच कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई येथे कॅन्सरबाबत तपासणीसाठी सवलतीचे कुपनही यावेळी देण्यात आले आहे. त्यानुसार महिलांसाठी ११ हजार ८७० रुपये खर्चाच्या तपासणी केवळ ३६०० रुपयांत, तर पुरूषांसाठी ११ हजार ४५० रुपये खर्चाच्या तपासण्या ३६०० रुपयांत करण्यात येणार आहे.

स्तन, गर्भाशय, ओव्हरीचा कॅन्सर होण्याचे प्रमाण अधिक
आधुनिक जीवनशैलीमुळे सद्यस्थितीत स्तनाचे कॅन्सर वाढले आहे. भारतात सर्वाईकल (गर्भाशयाचा कॅ न्सर)चे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच महिलांच्या रिप्रोडक्टिव सिस्टिममध्ये होणाऱ्या कॅन्सरचे प्रमाणही वाढले आहे. जसे गर्भाशयाचा कॅन्सर, अंडाशय व ओव्हरीचा कॅन्सर होण्याचे प्रमाण अधिक आहे. ओव्हरीच्या कॅन्सरची लक्षणे तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये दिसायला सुरुवात होते. यामुळे याचे निदान करणे कठीण होते, शिवाय या स्टेजमध्ये तो घातक ठरतो. सद्यस्थितीत ८० टक्के गर्भाशयाचे व ओव्हरीचे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. आपली लाईफस्टाईल बदल्यामुळे आधीच्या जनरेशनमध्ये व आताच्या जनरेशनमध्ये फरक पडत असून आताच्या जनरेशनमध्ये महिलांमध्ये कॅन्सर आजाराचे प्रमाण वाढले आहे, असे मत ज्येष्ठ कॅन्सरतज्ज्ञ योगेश कुळकर्णी यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केले.

कॅ न्सर रुग्णांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आलो होतो. सर्वांशी संवाद साधून खूप छान वाटले. रुग्णांचे अनुभव, कॅन्सरशी लढून त्यावर केलेली मात ऐकून मी प्रभावित झालो. तुम्ही मोकळेपणाने संवाद साधून तुमच्या शंकांचे निरसन व समाधान उत्तर देऊन बरे वाटले.
- योगेश कुलकर्णी,
कन्सल्टंट, अँकोलॉजी

प्रत्यक्ष भेटीत समारोसमोर चर्चा केल्यानंतर त्याचा जो प्रभाव पडतो, तो महत्त्वाचा असतो. त्यामुळे अनेक गोष्टींचे आदान-प्रदान होते. विचारांची देवाण-घेवाण होते. या उपक्रमामुळे आपणा सर्वांशी संवाद साधताना तसेच लोकमत सखी मंचमुळे कार्यक्रमाचे नियोजन खूपच चांगल्या पद्धतीने केले आहे.
- प्रणव चढ्ढा,
कन्सल्टंट, रेडिएशन अँकोलॉजी

Web Title: 'Cancers Can Cancel' In Early Diagnosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.