हत्तीवरून येतेय मकर संक्रांत
By admin | Published: January 14, 2015 10:59 PM2015-01-14T22:59:50+5:302015-01-14T22:59:50+5:30
सूर्य मकर राशित प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात. यंदा १५ जानेवारीला मकर संक्रात आली असून हत्ती या मुख्य वाहनावरून तर गाढव या उपवाहनावरून संक्रांतीचे आगमन होत आहे.
सूर्याचे संक्रमण : दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू
मोहन राऊत - अमरावती
सूर्य मकर राशित प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात. यंदा १५ जानेवारीला मकर संक्रात आली असून हत्ती या मुख्य वाहनावरून तर गाढव या उपवाहनावरून संक्रांतीचे आगमन होत आहे.
पौष महिन्यात येणारा एकमेव सण म्हणजे संक्रांत़ संक्रमण म्हणजे ओलांडून जाणे़ मकर राशीत सूर्याच्या प्रवेशाला मकर संक्रमण असे म्हणतात. संक्रांतीनंतर सूर्य उत्तरेकडे झुकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी देवीने शंकासुराचा नाश केल्याची पुरातन कथा आहे़ शंकासुराचा नाश करणारी देवी म्हणजे संक्रांतीला अनेक हात आहेत. या देवीने गोरोचनाचा टीळा लावला आहे़ ही देवी वयाने प्रौढ असून बसलेली आहे़ सुवासाकरीता तिने बेल घेतला आहे़ तर तीदुध भक्षण करीत आहे़ तिची जाती पशु आहे. वार नाव महोदरी असून नक्षत्र नाव राक्षसी असल्याचे पंचागकर्ते किशोर महाराज शास्त्री यांनी सांगितले़
संक्रांतीला नवीन तांब्याचे भांडे तुपाने आणी तिळाने भरून दान करणे गरजेचे आहे़ सूर्याची प्रतिमा व लोकरी कपडे आणि सवाष्ण महिलांना आवश्यक साहित्य दान केल्याने पुण्यप्राप्ती होते, असेही किशोर महाराज शास्त्री यांनी सांगितले. ही मकर संक्रात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना वायव्य दिशेस पाहत असल्याचे पंचांगात नमूद केले आहे़