कारचा भीषण अपघात पिता ठार, माता-पुत्र गंभीर
By admin | Published: June 5, 2014 11:41 PM2014-06-05T23:41:32+5:302014-06-05T23:41:32+5:30
कारच्या भीषण अपघातात पिता ठार झाल्याची घटना गुरुवारी शिरखेड पोलीस ठाण्यांतर्गत सावरखेड- गोराळा फाटा येथे घडली. मोहन गीरधर नागरेचा(५0) असे मृताचे नाव आहे.
बघ्यांची गर्दी : सावरखेडा येथील घटना
मोर्शी : कारच्या भीषण अपघातात पिता ठार झाल्याची घटना गुरुवारी शिरखेड पोलीस ठाण्यांतर्गत सावरखेड- गोराळा फाटा येथे घडली. मोहन गीरधर नागरेचा(५0) असे मृताचे नाव आहे. अपघातात मोहन यांची पत्नी हिना मोहन नागरेच्या (४५) व त्यांचा मुलगा रक्षक मोहन नागरेच्या (२१) हे दोघे गंभीर जखमी झाले.
मोहन नागरेच्या हे जुनी वस्ती बडनेरा येथे मेडिकल चालवीत होते. ते शुक्रवारी पत्नी हिना व मुलगा रक्षक यांच्यासह त्यांच्या एम. एच. ३३ ए २३४७ क्रमांकाच्या फोर्ड फीगो कारने विवाह समारंभाच्या कार्यक्रमासाठी मोर्शी येथे गेले होते. तेथून दुपारी ३ वाजता ते अमरावतीकडे परतीच्या प्रवासाला निघाले. दरम्यान सावरखेड -गोराळा मार्गाने अमरावतीकडे जाणार्या एका टेम्पो ट्रॅव्हल्स चालकाने त्यांच्या कारला मागून जबर धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, यामध्ये कार रस्ताच्या कडेला असणार्या एका शेतात जाऊन पलटी झाली. यात मोहन, हिना व रक्षक हे तिघे गंभीर जखमी झाले. या घटनेकडे तेथील काही नागरिकांचे लक्ष जाताच त्यांनी नागरेच्या कुटुंबीयांना कारमधून बाहेर काढुन त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी मोहन यांना मृत घाषित केले.
हिना व रक्षक यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती शिरखेड पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांनी त्यांच्या कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी पोलिसांची कारवाई सुरु होती. (प्रतिनिधी)