अकोला महामार्गावर कार अँब्युलंसचा अपघात, चार ठार, पाच जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 10:16 PM2017-12-24T22:16:11+5:302017-12-24T22:16:14+5:30
अकोला राष्ट्रीय महामार्गावरील नागझिरी फाट्यासमोर कारला अँम्ब्युलंसची धडक लागल्याने चौघे ठार, पाच जखमी झाल्याचे वृत्त आहे.
बडनेरा (अमरावती) : अकोला राष्ट्रीय महामार्गावरील नागझिरी फाट्यासमोर कारला अँम्ब्युलंसची धडक लागल्याने चौघे ठार, पाच जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री ८.३० वाजता दरम्यान घडली. दोघांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात विच्छेदनासाठी आणले असून दोघांचा शोध लोणी (टाकळी) पोलीस घेत आहे.
लोणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.एच १४ सीएल-१८९३ क्रमांकाची रुग्णवाहिका अकोला मार्गे लोणीहून मानाकडे जात होती, तर एम.एच.४० एआर ५९७० क्रमांकाची कार (वॅगन आर) ही अकोला येथून अमरावती मार्गे येत होती. दरम्यान वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली. यात चौघे जागीच ठार झाले. नागपूर वाडी येथील रोकडे कुटुंबातील सातजण कारने येत होते. यामध्ये निखिल (२७), अनिता रोकडे (५५), रमेश रोकडे (५०), बाबाराव रोकडे, मनीषा, बाबाराव, सोहम व अमृता या रोकडे कुटुंबीयांचा समावेश आहे. यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये मनीषा, रमेश, बाबाराव, सोहम या चौघांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात विच्छेदनासाठी आणले आहे. जखमींमध्ये कारमधील तिघांसह दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयातील १०८ अँब्ल्युलन्समधील डॉ. रवींद्र ठाकरे (२७), चालक महेंद्र यशवंत खाडे (४०) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच लोणी ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश चतरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दोन मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले आहे. वृत्त लिहिस्तोवर कार्यवाही सुरू होती.