कार उड्डाणपुलाच्या पिलरला धडकली; एक ठार, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:14 PM2018-09-01T23:14:41+5:302018-09-01T23:15:12+5:30

भरधाव कार उड्डाणपुलाच्या पिलरला धडकल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर चार गंभीर जखमी झाले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ते सर्र्वेक्षण करण्यासाठी आले होते. शाहू राजू भोसले (३४, रा. बदलापूर) असे मृताचे, तर शैलेश धमरे (४८, रा. मुंबई), श्रेयस श्रीराम कटक (२८, रा. सांगली), आकाश कश्यप (२६) व तुषार मुरलीधर भुतडा (२८, रा. साईनगर) अशी जखमींची नावे आहेत.

Car flown to Pillar; One killed, four injured | कार उड्डाणपुलाच्या पिलरला धडकली; एक ठार, चार जखमी

कार उड्डाणपुलाच्या पिलरला धडकली; एक ठार, चार जखमी

Next
ठळक मुद्देराजकमल चौकात मध्यरात्री भीषण अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भरधाव कार उड्डाणपुलाच्या पिलरला धडकल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर चार गंभीर जखमी झाले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ते सर्र्वेक्षण करण्यासाठी आले होते. शाहू राजू भोसले (३४, रा. बदलापूर) असे मृताचे, तर शैलेश धमरे (४८, रा. मुंबई), श्रेयस श्रीराम कटक (२८, रा. सांगली), आकाश कश्यप (२६) व तुषार मुरलीधर भुतडा (२८, रा. साईनगर) अशी जखमींची नावे आहेत.
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मीडिया सोल्यूशनचे काही अधिकारी व कर्मचारी अमरावतीत सर्वेक्षणासाठी आले. शनिवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास ते कामे आटोपून कार (एमएच २७ एबी-०००९) ने इर्विन चौकात पोहोचले. त्यांनी चालकास सिगारेट घेण्यासाठी पानटपरीवर पाठविले. सिगारेट न मिळाल्याचे पाहून चालकास तेथेच सोडून शाहू भोसले याने कारचा ताबा घेत जयस्तंभ चौकाच्या दिशेने भरधाव नेली. राजकमल चौकाकडे वळण घेत असताना भरधाव कारचा टायर फुटला आणि श्याम चौकातील उड्डानपुलाच्या पिलरला कार आदळली. यात शाहू जागीच ठार झाला, तर सोबतचे चौघेही जखमी झाले. काही अंतरावर असणारे कोतवालीचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावून गेले. पोलिसांनी जखमींना कारमधून बाहेर काढून तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. कोतवाली पोलिसांनी मृतकाविरुद्ध भादंविचे कलम ३०४ (अ), ३३७, ३३८, ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची नवनीत राणा यांनी शनिवारी भेट घेतली.

Web Title: Car flown to Pillar; One killed, four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.