एनसीसी कॅडेट्सकडून कारगिल विजय दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 01:35 AM2019-07-27T01:35:33+5:302019-07-27T01:36:44+5:30

८-महाराष्ट्र बटालियनतर्फे आयोजित ४-गर्ल्स महाराष्ट्र बटालियनच्या वार्षिक शिबिरात शुक्रवारी एनसीसी कॅडेटनी कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. कारगिल युद्धात जवानांचे योगदान व यशाची गाथा ब्रिगेडिअर संग्राम दळवी (सेना मेडल) यांनी कॅडेटपुढे विशद केली.

Cargill Victory Day from NCC Cadets | एनसीसी कॅडेट्सकडून कारगिल विजय दिन

एनसीसी कॅडेट्सकडून कारगिल विजय दिन

Next
ठळक मुद्दे८-महाराष्ट्र बटालियन आयोजन : ४-गर्ल्स महाराष्ट्र बटालियनचे वार्षिक शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ८-महाराष्ट्र बटालियनतर्फे आयोजित ४-गर्ल्स महाराष्ट्र बटालियनच्या वार्षिक शिबिरात शुक्रवारी एनसीसी कॅडेटनी कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. कारगिल युद्धात जवानांचे योगदान व यशाची गाथा ब्रिगेडिअर संग्राम दळवी (सेना मेडल) यांनी कॅडेटपुढे विशद केली. त्यांनी या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.
४-गर्ल्स महाराष्ट्र बटालियनचे वार्षिक शिबिर १८ ते २७ जुलैदरम्यान होत आहे. यादरम्यान एनसीसी कॅडेट मुलींना प्रशिक्षण देण्यात येत आहे. याशिवाय विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कॅडेटना प्रोत्साहित केले जात आहे. या शिबिरात फायरिंग व व्यक्तीमत्व विकासाचे धडे कॅडेटने घेतले. या माध्यमातून थल सेना कॅम्पसाठी ग्रुप तयार केला जात आहे.
८-महाराष्ट्र बटालियन परिसरातील सभागृहात शुक्रवारी सकाळी कारगिल विजय दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एनसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कॅडेटनी कारगिल युद्धातील शहिदांना मानवंदना दिली. ब्रिगेडिअर संग्राम दळवी यांनी कॅडेटना कारगिल युद्धाची सुरुवात, भारतीय जवानांचे शौर्य, अतुलनीय पराक्रमासाठी परमवीर चक्र मिळविणारे कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यासह इतर जवानांच्या कामगिरीबाबत इत्थंभूत माहिती दिली. कारगिल युद्धामध्ये भारतीय जवानांनी कशाप्रकारे समयसूचकता बाळगून विजय मिळविला. त्यांनी कशाप्रकारे युद्धाची स्थिती हाताळली, यासंबंधी मार्गदर्शन केले. एनसीसीच्या मुलींनी कारगिल युद्धाविषयी आपआपले भावना मंचावर व्यक्त केल्या. याशिवाय कॅडेटना कारगिल युद्धाची चित्रफीत पडद्यावर दाखविण्यात आले.
कार्यक्रमात कॅम्प कमांडर कर्नल एम. रविराव, सुभेदार मेजर चतुरसिंग, अशोकुमार (लेफ्टनंट), एनसीसी कार्यालयातील अनिल मोहोड, अशोक बेलसरे, सुरेश पवार, प्रदीप तायडे, मंजूषा तनपुरे, निदेशक प्रज्ञा चवरे, राणी बिजोरे, एएनओ पंकज गिरी आदी उपस्थित होते.

एनसीसी कॅडेट देशभक्ती गीतांमध्ये रमल्या
कारगिल विजय दिन साजरा करताना एनसीसीच्या कॅडेटनी सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांवर परेड व नृत्य सादर केले. युद्धजन्य स्थितीत शौर्यगीतांवर थरारक प्रात्यक्षिके कॅडेटनी सादर केल्याने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

पोस्टर प्रदर्शन
काही एनसीसी कॅडेटनी कारगिल विजय दिनानिमित्त पोस्टर रंगवले. त्यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. अत्यंत सुबक, सुंदर व उत्कृष्ट छायाचित्रे पाहून उपस्थित अधिकाऱ्यांनी कॅडेटचे कौतुक केले.

Web Title: Cargill Victory Day from NCC Cadets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.