सुतार व्यवसाय काळाच्या पडद्याआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:10 AM2021-06-21T04:10:06+5:302021-06-21T04:10:06+5:30
विज्ञान आणि प्रगती केल्याने आधुनिकीकरणाचे वारे शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्याने यंत्रांचा वापर वाढला. बहुतांश कामे यंत्राच्या साह्याने शेतकरी होत आहेत. परिणामी ...
विज्ञान आणि प्रगती केल्याने आधुनिकीकरणाचे वारे शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्याने यंत्रांचा वापर वाढला. बहुतांश कामे यंत्राच्या साह्याने शेतकरी होत आहेत. परिणामी पिढ्यानपिढ्या व्यवसाय करून कुटुंबाची उपजीविका भागविणाऱ्या सुतार समाजावर उतरती कळा आल्याचे ग्रामीण भागात दिसते.
मृग नक्षत्र सुरुवात होताच ग्रामीण भागातील शेतकरी सुताराकडे गर्दी करायचा. कुणाला तिफन, वखर, किंवा काकरी शेतकरी बनवत होता. सुतारकाम करणारे कारागीर मोजकेच असल्याने शेतकऱ्यांना त्या कारागिराची मनधरणी करावी लागत होती. परंतु लाकडी साहित्याची जागा लोखंडी अवजाराने घेतल्याने याचा परिणाम सुतार कारागिराला झाल्याचे दिसते आहे.
एखादे वखर किंवा अन्य कोणतेही शेती उपयोगी साहित्य बनविण्यासाठी विशिष्ट प्रकारचे लाकूड शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसातच सुतार कारागिराकडे घेऊन जात होते. त्याला कारागीर योग्य आकार देऊन साहित्य बनवत होता. आता मात्र याची जागा लोखंडी साहित्याने घेतल्यामुळे शेती उपयोगी लाकडी साहित्य काळाच्या पडद्याआड गेल्याचे चित्र एकंदरीत ग्रामीण भागात तरी सध्या दिसत आहे.
काही वर्षापूर्वी प्रत्येक शेतकरी शेतात तिफनचा वापर पेरणीसाठी करीत होता. आता मात्र तिफनची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने पेरणीसुद्धा ट्रॅक्टरच्या साह्याने होऊ लागल्याने काळ्या मातीत चालणारी तिफनसुद्धा काळाच्या पडद्याआड गेली आहे.
येणाऱ्या पिढीला शेतीतील लाकडी अवजारांचा शेतकरी उपयोग करत होता, हे मात्र चित्र पुस्तकातूनच पाहायला मिळतील काय, असे दिसत आहे.
पूर्वीच्या काळात ग्रामीण भागात सुतार कारागिराचा विशिष्ट जेथे राहायचे त्या ठिकाणाला ग्रामीण भागात ‘कामठा‘ हा शब्द प्रचलित होता. आता तो कामठा काळाच्या पडद्याआड गेल्याने ग्रामीण भागातील शेतकरीही त्याकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. सुतार कारागीर काम करणारे नवीन कारागीर सुद्धा तयार होत नाही कारण विज्ञानाने प्रगती केल्याने ही समस्या ही मोठी निर्माण झाली असल्याने कारागीरसुद्धा दिसेनासे झाले आहे.