मद्य पाजून तरुणीवर लैंगिक अत्याचार, बळजबरीने कोर्ट मॅरेजही; गुन्हा दाखल
By प्रदीप भाकरे | Published: November 9, 2022 01:20 PM2022-11-09T13:20:42+5:302022-11-09T13:23:19+5:30
मारहाण, शिवीगाळ; तरुणीची अखेर पोलिसांत धाव
अमरावती : एका तरुणीला मद्य पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तिच्याशी बळजबरीने कोर्ट मॅरेज देखील केले. मात्र, त्यानंतरही अनन्वित छळाची मालिका थांबली नाही. त्यामुळे मनाचा हिय्या करत तिने ही बाब कुटुंबियांच्या कानावर घातली. अखेर ठाणे गाठण्यात आले. जानेवारी ते ७ नोव्हेंबरदरम्यान ती छळमालिका चालली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी ८ नोव्हेंबर रोजी आरोपी विक्की उर्फ दादू वसंतराव पाटील (२५, रा. किरणनगर) याच्याविरूध्द बलात्कार, गुन्हा करण्याच्या उद्देशाने मद्य पाजणे, शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, पिडित तरूणी व आरोपी विक्की यांच्यात जुनी ओळख होती. त्यातून काही दिवसांनी त्यांच्यात मैत्रीबंध फुलले. संवाद वाढल्याने प्रेमसंबंध देखील निर्माण झाले. दोघांच्याही भेटी गाठी होऊ लागल्या. जानेवारी महिन्यानंतर आरोपी विक्कीने फ्रेेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी तिला भेटायला बोलावले. तेथील खोलीत आरोपीने तिला जबरदस्तीने दारू पिण्यास भाग पाडले. तिच्यावर मद्याचा अंमल चढताच, त्या स्थितीचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. परत एकदा खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परिसरातील खोलीतही तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर आरोपीने तिला धमकावले. तथा मारहाण करून तिला कोर्ट मॅरेजसाठी तयार केले. दोघांचे कोर्ट मॅरेज देखील झाले. मात्र, ती माहेरी व तो त्याच्या घरी राहू लागला.
छळमालिका
कोर्ट मॅरेजनंतर त्याचा खरा चेहरा उघड झाला. त्यामुळे ती त्याला टाळू लागली. मात्र, आरोपीने तिला वारंवार भेटण्यास बाध्य केले. भेटायला न गेल्यास तिला धमकावण्यात आले. तो तिला पैसे देखील मागू लागला. एकवेळ ती भेटली नाही, तर त्याने तिचे घर गाठले. तेथे तिला मारहाण करून शिविगाळ देखील केली. जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकंदरित सर्व प्रकार तिच्या कुटुंबियांच्या ध्यानी आला. त्यामुळे पिडिताने आईजवळ आपबिती कथन केली. आईने तिला धीर देऊन पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पिडिताने आईसह पोलीस ठाणे गाठले. सहायक पोलीस निरिक्षक प्रशाली काळे यांनी तिची तक्रार दाखल करून घेतली.
आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, माजी आमदार राजू तिमांडे, माजी नगरसेवक अनिल भोंगाडे, माजी नगरसेवक सौरभ तिमांडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष कविता मुंगले, शहर अध्यक्ष मृणाल रिठे, सुचिता सातपुते, निखील गेडाम, विकी शिंदे आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते.