पुणे येथील आदिवासी संशोधन अधिकाऱ्यांची कास्ट व्हॅलिडिटी रद्द; राज्यात बोगस जात वैधता प्रमाणपत्राची शोधमोहीम

By गणेश वासनिक | Published: July 27, 2023 07:53 PM2023-07-27T19:53:43+5:302023-07-27T19:55:26+5:30

...त्याअनुषंगाने पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे कार्यरत आदिवासी संशोधन अधिकारी रेखा राजन्ना कुडमूलवार यांची ‘मन्नेरवारलू’ जमातीची ‘कास्ट व्हॅलिडिटी’ रद्द ठरल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Cast validity of tribal research officers in Pune cancelled; Investigation of bogus caste validity certificates in the state | पुणे येथील आदिवासी संशोधन अधिकाऱ्यांची कास्ट व्हॅलिडिटी रद्द; राज्यात बोगस जात वैधता प्रमाणपत्राची शोधमोहीम

पुणे येथील आदिवासी संशोधन अधिकाऱ्यांची कास्ट व्हॅलिडिटी रद्द; राज्यात बोगस जात वैधता प्रमाणपत्राची शोधमोहीम

googlenewsNext

अमरावती : बोगस जात वैधता प्रमाणपत्र मिळवून नोकरी, शिक्षण, राजकीय क्षेत्रात लाभ घेत असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने राज्य शासनाने बनावट ‘कास्ट व्हॅलिडिटी’ची शोधमाेहीम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे कार्यरत आदिवासी संशोधन अधिकारी रेखा राजन्ना कुडमूलवार यांची ‘मन्नेरवारलू’ जमातीची ‘कास्ट व्हॅलिडिटी’ रद्द ठरल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रेखा कुडमूलवार या नांदेड जिल्ह्यामधील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी या गावच्या आहेत. त्यांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कुंडलवाडी येथील रक्तसंबंधी असलेले आजोबा, चुलत आजोबा, चुलत आजी अशा सहा नातेवाइकांच्या मुनुर्वार, मुनूरवार, मुनूरवाड अशा नोंदी असलेले दाखल खारीज क्र. ६८२, ३५५, १०१/३६३,४०३,९६/२२२,१३९/२९३ हे शालेय पुरावे समितीपासून लपवून ठेवले.

जिल्हा परिषद हायस्कूल कुंडलवाडी येथील अभिलेखात रक्तसंबंधी असलेले तीन चुलत आजोबा प्रवेश निर्गम / दाखल खारीज क्र.१०७ / ८४८, ६७३ / १४०९, १३३० यात मनेरवार, मन्नेरवार मुनूरवार या जातीच्या शेवटी ‘लू’ लावून मूळ नोंदीत नियमबाह्य फेरबदल करण्यात आले, तर त्यांच्या वडिलांची आत्या पुष्पलता चिन्नना कुडमूलवार दाखल खारीज क्र.२२३४ यांची जात चक्क शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद नांदेड यांचा आदेश दि. २२ ऑक्टोबर १९८२ अन्वये ‘मुनूरवार’ या शब्दाला गोल करून ‘मन्नेरवारलू’ हा शब्द वेगळ्या शाईत व वेगळ्या हस्ताक्षरात लिहिलेला असल्याचे पोलिस दक्षता पथकाच्या चौकशीदरम्यान निदर्शनास आले आहे. त्या मुळात ‘मुनूरवार’ जातीच्या असून, उपविभागीय अधिकारी देगलूर यांच्याकडून त्यांनी ‘मन्नेरवारलू’ जमातीचे जातप्रमाणपत्र क्र.२००२ / ए / एमएजीटी ६ सीसी-एससी क्रमांक ११०८/ २९ ऑक्टोबर २००२ रोजी मिळविले. याच जमाती प्रमाणपत्राच्या आधारे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती औरंगाबाद यांच्याकडून टीसीएससी ०८०३५७ क्रमांकाचे जमाती वैधता प्रमाणपत्र २१ ऑगस्ट २००८ रोजी मिळविले.

महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग अधिनियम २००० च्या कलम १० ते १२ मधील तरतुदी अन्वये संशोधन अधिकारी रेखा कुडमूलवार यांचेवर कारवाई करण्यात यावी. त्यांचे रक्तनात्यातील व वंशावळीतील सर्वांचे जमाती प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्रांचा शोध घेऊन ते रद्द करण्यात यावे.
- बाळकृष्ण मते, राज्य उपाध्यक्ष ट्रायबल फोरम महाराष्ट्र

Web Title: Cast validity of tribal research officers in Pune cancelled; Investigation of bogus caste validity certificates in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.