मांज्यामुळे दोन पक्ष्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:32 PM2018-01-13T22:32:14+5:302018-01-13T22:32:33+5:30

नॉयलॉन मांज्यावर बंदी असताना शहरात सर्रास याचा उपयोग करून पतंगी उडताना दिसत आहेत.

Cats cause two birds to die | मांज्यामुळे दोन पक्ष्यांचा मृत्यू

मांज्यामुळे दोन पक्ष्यांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देस्थलांतरित पक्ष्यांनाही फटका : दोन महिन्यांत सात पक्ष्यांसाठी रेस्क्यू

आॅनलाईन लोकमत
अमरावती : नॉयलॉन मांज्यावर बंदी असताना शहरात सर्रास याचा उपयोग करून पतंगी उडताना दिसत आहेत. नॉयलॉन मांज्यामुळे हवेत उडणारे किंवा झाडावर बसणाऱ्या पक्ष्यांचे जीव धोक्यात आले आहे. दोन महिन्यांत पक्षिप्रेमींनी सात पक्ष्यांसाठी रेस्क्यू आॅपरेशन चालविले. त्यापैकी पाच पक्ष्यांचे जीव वाचविण्यात पक्षिपे्रमींना यश आले, तर दोन पक्षी दगावले.
पतंग उडविण्याचा आनंद पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. दरवर्षी पतंगीच्या धाग्यात अडकून २० ते २५ पक्षी मरतात, तर शेकडो जखमी होतात. मकर संक्रांतीच्या पर्वावर सर्वाधिक पतंग उडविल्या जातात. पेचा लावण्यासाठी मांज्याला अधिक धारदार बनविण्याचा प्रयत्न होतो. यामध्ये पतंगीसाठी चायना किंवा नॉयलॉन मांजा सर्रास वापरला जातो. मात्र, या मांज्यामुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. या मांज्यामुळे सर्वाधिक नुकसान पक्ष्यांचे झाले आहे. त्यामुळे नॉयलॉन मांज्यावर बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, तरीसुद्धा छुप्या मार्गाने नॉयलॉन मांज्याची विक्री करून व्यापारी वर्ग सर्वसामान्यांचा जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे नॉयलॉन मांज्याची खरेदी करू नका, असे आवाहन पक्षिबचावाचा नारा देणाºया वसा, नेचर फ्रेन्ड्स व मधुबन यांनी केला आहे. शहरात कोठेही जखमी किंवा मांज्यात अडकलेले पक्षी आढळून आल्यास पक्षिप्रेमी गणेश अकर्ते, अभि दाणी व शुभम सायंके यांच्या ९५९५३६०७५६, ९५७९१११०१७, ९९७०३५२५२३ या क्रमांकावर तत्काळ संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
रेस्क्यू टीमद्वारे २४ तास सेवा
वसाचे पक्षिमित्र गणेश अकर्ते यांच्या नेतृत्वात रेस्क्यू टीमचे अभिजित दाणी, भूषण सायंके, अक्षय चांबटकर, रितेश हंगरे, मुकेश वाघमारे, तुषार वानखडे, अभिषेक पुल्लजवार, रोहित रेवाळकर, सूरज लव्हाळे, अंकुश खरड, आशिष गुप्ता, ठकसेन इंगोले, यश सोनारे, अनिकेत देशमुख आणि शुभम सायंके हे पक्षी वाचविण्यासाठी २४ तास सेवा देत आहेत. जखमी पक्षांच्या उपचारासाठी रेस्क्यू टीम सज्ज झाली आहे. या पक्ष्यांना योग्य व वेळीच उपचार मिळावेत, यासाठी यादव तरटे, जयंत वडतकर, छायाचित्रकार मनोज बिंड निरीक्षक म्हणून काम पाहत आहे.

Web Title: Cats cause two birds to die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.