मांजाने चिमुकलीचा गळा पित्याचा हात चिरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:00 AM2019-11-11T05:00:00+5:302019-11-11T05:00:43+5:30

अचानक रस्त्यातच मांजाने चिमुकलीचा गळा, तर पित्याचा दंड कापला गेला. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास वडाळीजवळील सुपर हायवेवर घडली. कोमल उल्हास पांडे (७) असे चिमुकलीचे, तर उल्हास महादेव पांडे (३७, रा. पिंपळगाव चांभारे, जि. अकोला) जखमीचे नाव आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Cat's chin cut off Father's hand | मांजाने चिमुकलीचा गळा पित्याचा हात चिरला

मांजाने चिमुकलीचा गळा पित्याचा हात चिरला

googlenewsNext
ठळक मुद्देवाचला जीव : वडाळीलगत सुपर हायवेवरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दोन मुलींसह पत्नीला घेऊन दुचाकीने जात असताना अचानक रस्त्यातच मांजाने चिमुकलीचा गळा, तर पित्याचा दंड कापला गेला. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास वडाळीजवळील सुपर हायवेवर घडली. कोमल उल्हास पांडे (७) असे चिमुकलीचे, तर उल्हास महादेव पांडे (३७, रा. पिंपळगाव चांभारे, जि. अकोला) जखमीचे नाव आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उल्हास पांडे हे पत्नी शालू, मुली वेदिका व कोमल यांना घेऊन शनिवारी वºहा-कुºहाजवळील घोटा गावी सासरी गेले होते. तेथून पांडे कुटुंबीय रविवारी सकाळी दुचाकीने अकोल्याकडे निघाले होते. कोमल पुढे, तर वेदिका व शालू या मागे बसल्या होत्या. दुचाकी वडाळीच्या सुपर हायवेवरून बडनेराच्या दिशेने भरधाव जात असताना अचानक कोमलच्या गळ्यात पतंगाचा मांजा येऊन अडकला आणि तिचा गळा कापला गेला. उल्हास पांडे यांनी तात्काळ बेक्र मारून दुचाकी थांबविली. त्यात हे कुटुंबीय खाली कोसळले. मांजाने शर्ट कापून उजव्या हाताच्या दंडालाही चिरल्याचे दिसून आले.
दरम्यान, उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतीचा हात देऊन जिल्हा या कुटुंबाला सामान्य रुग्णालयात आणले. सुदैवाने कोमलच्या गळ्यातील आतील नसांना इजा झाली नव्हती; मात्र गळ्याची त्वचा गंभीररीत्या कापली गेल्याचे निदर्शनास आल्याने डॉक्टरांनी कोमल व उल्हास यांच्यावर तात्काळ औषधोपचार सुरू केला. कोमलला वॉर्डात हलविण्यात आले आहे. या घटनेच्या माहितीवरून फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेश भगत यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन जखमींचे बयाण नोंदविले.

दुचाकी थांबल्याने
जीवितहानी टळली
उल्हास पांडे यांचे दुचाकी चालविण्याकडे लक्ष होते. यादरम्यान मांजा मुलीच्या गळ्याला लागल्याचे निदर्शनास येताच, त्यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ बे्रक लावले. त्यामुळे दुचाकी थांबली. भरधाव दुचाकी थोडी जरी पुढे गेली असती, तर मुलीला जिवाशी मुकण्याची स्थिती उत्पन्न झाली असती.

नायलॉन मांजावरील बंदी नावापुरतीच
शासनाने नायलॉन मांजाच्या वापरावर व उत्पादनावर बंदी घातलेली आहे. तरीसुद्धा अमरावती शहरात नॉयलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू आहे. उल्हास पांडे यांच्यासह त्यांच्या सात वर्षीय मुलीचा अनुक्रमे हात व गळा कापण्यास नॉयलॉन मांजा कारणीभूत ठरला आहे. नायलॉन मांजाबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीकडे कुठलीही यंत्रणा गंभीर नाही. एखाद्याचा जीव जाण्याजोगा प्रसंग घडूनही अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष कायम आहे.

Web Title: Cat's chin cut off Father's hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kiteपतंग