दहिगाव येथून पशुचोर पोलिसांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:16 AM2021-08-20T04:16:48+5:302021-08-20T04:16:48+5:30

पोलीस सूत्रांनुसार, काशीराम चोपडे यांनी घरापुढील बैलबंडीला बांधलेली गाय चोरून नेत असल्याचे निदर्शनास येताच अनूप प्रकाश चोपडे यांनी त्यांचे ...

Cattle from Dahigaon handed over to police | दहिगाव येथून पशुचोर पोलिसांच्या स्वाधीन

दहिगाव येथून पशुचोर पोलिसांच्या स्वाधीन

Next

पोलीस सूत्रांनुसार, काशीराम चोपडे यांनी घरापुढील बैलबंडीला बांधलेली गाय चोरून नेत असल्याचे निदर्शनास येताच अनूप प्रकाश चोपडे यांनी त्यांचे दार ठोकून जागे केले व त्यानंतर ते चोरट्यांच्या मागोमाग गेले. यावेळी ग्रामस्थांनीदेखील पाठलाग केला. हे लक्षात येताच एक जण पळून गेला, तर बाबाराव सदाशिव बोरकर (६३, रा. विळेगाव, ता. कारंजा लाड, जि. वाशिम) हा सापडला. घटनास्थळी पोलिस पाटलांना बोलावण्यात आले त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. लोणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

-------------------

रेशन दुकानाची तक्रार दिली म्हणून मारहाण

कुऱ्हा : अमदरी येथील रेशन दुकानाची तक्रार दिल्याचा रोष भुजंगराव साहेबराव तायवाडे (४५) यांच्या मारहाणीत प्रकट झाला. समीर योगेश राऊत (२८), योगेश नारायण राऊत व राजेंद्र नारायण राऊत यांनी भुजंगराव तायवाडे यांची दुचाकी अडविली. ती पाडल्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------------

मद्यपीकडून शिवीगाळ, मारहाण

कुऱ्हा : अमदरी येथील भुजंग साहेबराव तायवाडे या व्यक्तीने मध्यपान करून अर्वाच्य शिवीगाळ केली. शेतातून घरी येत असलेल्या काकूने हटकले असता त्यांच्याविषयी अपशब्दही वापरल्याची तक्रार समीर योगेश राऊत यांनी कुऱ्हा पोलीस ठाण्यात नोंदविली. एवढेच नव्हे तर भुजंगने रस्त्यावरील दगड समीरवर भिरकावला. त्यानंतर सागर विनोद जुनघरे हा तेथे आला व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

-------------------------------------

Web Title: Cattle from Dahigaon handed over to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.