महामार्गावर गुरांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:10 AM2021-06-28T04:10:29+5:302021-06-28T04:10:29+5:30

अमरावती : शहरातून जाणाऱ्या जुन्या बायपास मार्गावर गुरांचा सदैव वावर वाढल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने ...

Cattle grazing on the highway | महामार्गावर गुरांचा ठिय्या

महामार्गावर गुरांचा ठिय्या

Next

अमरावती : शहरातून जाणाऱ्या जुन्या बायपास मार्गावर गुरांचा सदैव वावर वाढल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची नागरिकांची मागणी आहे.

-----------------------

डबलिंग रेट १२४ दिवसांवर

(फोटो/ कोरोना)

अमरावती : जिल्ह्यात दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्येत कमी आली परिणामी रुग्ण दुपटीच्या कालावधीत वाढ झालेली आहे. सध्या हा कालावधी १२४ दिवसांवर गेल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

-------------------

कॅम्प मार्गाची दुरुस्ती केव्हा?

अमरावती : शहरातील मुख्य मार्ग असलेल्या इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालया दरम्यानचा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. या रस्त्याची दुरुस्त करण्यात नागरिकांची मागणी आहे.

--------------------

पेरणी झाल्या, पावसाची प्रतीक्षा

अमरावती : जिल्ह्यात आतापर्यत सरासरीच्या ३१ टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र, पावसाचा खोळंबा असल्याने कोवळ्या पिकांनी माना टाकल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.

--------------------

आजपासून चौकाचौकात वॉच

अमरावती : महापालिका क्षेत्रातील चौकाचौकात आजपासून २० पथकांचा वॉच तीन दिवस राहील, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन नसल्यास दंडात्मक कारवाई पथकांद्वारे केली जाणार आहे.

Web Title: Cattle grazing on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.