नागपूर-अमरावती राज्यमहामार्गावरच उभी राहतात गुरे; अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 11:09 AM2020-09-12T11:09:23+5:302020-09-12T11:10:45+5:30

तळेगाव - आष्टी राज्यमहामार्गावर गुरे जंगलात चरायला जाण्याअगोदर सकाळी सात वाजतापासून ते दहा वाजेपर्यंत ऐन रोडवर उभी असतात त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असुन ही गुरे सध्या अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.

Cattle live on the Nagpur-Amravati state highway; Invitation to an accident | नागपूर-अमरावती राज्यमहामार्गावरच उभी राहतात गुरे; अपघाताला निमंत्रण

नागपूर-अमरावती राज्यमहामार्गावरच उभी राहतात गुरे; अपघाताला निमंत्रण

Next
ठळक मुद्देरहदारीला अडथळाजीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास


लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: तळेगांव (शा.पं.) येथील गावालगत जात असलेल्या तळेगाव - आष्टी राज्यमहामार्गावर गुरे जंगलात चरायला जाण्याअगोदर सकाळी सात वाजतापासून ते दहा वाजेपर्यंत ऐन रोडवर उभी असतात त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असुन ही गुरे सध्या अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने या गुरांबाबत संबंधितांकडून ठोस उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तळेगांव आष्टी राज्य महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ ला जोडलेला आहे या राज्य महामागार्चे नुकतेच रुंदिकरन करण्यात आले असून गावाजवळ सौंदर्यीकरणाचे काम सुरु आहे. हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. त्यातच दुचाकी, चारचाकी वाहनांबरोबर अवजड वाहनांचाही यामध्ये मोठ्या प्रमाणात सामावेश आहे. सतत वर्दळीच्या या राज्य महामार्गावर मात्र सकाळी ७ ते १० या कालावधीत जंगलात चरायाला जाण्याअगोदर गुरे प्रचंड प्रमाणात आणुन उभी राहत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.

तसेच गावात मोकाट जनावरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असुन गावातील रोडवर, उड्डाण पुलाखाली, आर्वी रोडवर, राष्ट्रीय महामार्गावर क्रं. सहा वर सुद्धा रात्री मोकाट गुरे बसत असल्याने अंधारात रस्त्यात बसलेली गुरे नजरेस न आल्यामुळे अपघात घडून अनेक जण जखमी, तर काहींना कायमचे अपंगत्व आले तर अनेक गुरांचा जीव गेला असल्याच्या कित्येक घटना घडल्याचे ग्रामस्थ सांगतात. गुरांच्या या कळपामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीसुद्धा होते. सकाळी आष्टी रोडवर उभी ठेवण्यात येत असलेली गुरे तसेच गावातील मोकाट गुरांच्या उपाययोजने बाबत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतला निवेदन दिले असून याबाबत ठोस कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

 

 

 

Web Title: Cattle live on the Nagpur-Amravati state highway; Invitation to an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cowगाय