बडनेऱ्यातील गुरांच्या बाजारात आर्थिक उलाढालीला गती मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:14 AM2021-01-25T04:14:47+5:302021-01-25T04:14:47+5:30
कोरोनाचा फटका, जिल्ह्यातील मोठा बाजार ठप्प बड़नेरा : कोरोना संसर्गामुळे मार्चपासून येथील जुनी वस्तीतील शुक्रवार गुरांच्या बाजार बंद ...
कोरोनाचा फटका, जिल्ह्यातील मोठा बाजार ठप्प
बड़नेरा : कोरोना संसर्गामुळे मार्चपासून येथील जुनी वस्तीतील शुक्रवार गुरांच्या बाजार बंद असल्याने मोठा फटका बसला आहे. अद्यापही आर्थिक उलाढाल मंदावलेलीच आहे. शेतकरी महत्त्वाचा दुवा असताना तोच नापिकीच्या संकटात सापडल्याने या बाजारावर मोठा आर्थिक परिणाम झाला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावतीच्या अंतर्गत बड़नेऱ्यात दर शुक्रवारी गुरांचा बाजार भरतो. कोरोना संसर्गाचा या बाजारावर मोठा परिणाम झाल्याच्या प्रतिक्रिया येथे येणाऱ्या खरेदी-विक्रेत्यांमध्ये आहे. ‘सर्वांत मोठा बाजार’ म्हणून ओळख असणाऱ्या या बाजारात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशासह इतरही राज्यांतून जनावरे विक्रीसाठी येत असतात. विशेषकरून म्हशींचा अधिक समावेश असतो. महागड्या म्हशी परराज्यांतून विक्रीसाठी येतात. कोरोनाच्या संसर्गात बाजार बंदच होता. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बाजार भरणे सुरू झाले सुरुवातीला विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची संख्या फारच कमी होती आता गर्दी वाढली आहे. मात्र, खरेदीदार नसल्याने बाजारातील उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे. यंदा शेतकऱ्यांना नापिकीचा फटका बसला. त्यात कोरोनाच्या संकटाने बहुतांश शेतकऱ्यांनी गुरांच्या बाजाराकडे पाठ फिरविली आहे. पैसाच नाही जनावरे विकत कशी घेणार हा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये आहे. बाजारात जनावरांच्या खरेदी-विक्रीमध्ये शेतकरी महत्त्वाचा दुवा असतो. येथील बाजारावर बऱ्याच लोकांना रोजगार मिळतो. प्रामुख्याने जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना देखील त्याचा आर्थिक फटका बसलेला आहे. असे असले तरी लवकरच बाजाराची उलाढाल पूर्वपदावर येईल अशी आशा खरेदी-विक्री दार बाळगून आहे. बाजार समितीने देखील बाजारातील आर्थिक उलाढाल पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे बोलल्या जात आहे. परिसरात सर्वांत मोठा गुरांचा बाजार म्हणून याची ओळख आहे. लाखो रुपयांची उलाढाल जनावरांच्या खरेदी-विक्रीमध्ये येथे होत असते.
कोट
समितीचा कोट घेणे