बडनेऱ्यात गुरांचा बाजार भरला, गर्दीच गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 12:54 AM2020-03-21T00:54:36+5:302020-03-21T00:56:00+5:30
सध्या कोरोनामुळे गर्दी टाळा, असे सातत्याने सांगितले जात आहे. मात्र, बाजार समितीला याचा विसर पडला. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराआदेशाची थट्टा : परराज्यातून आणली गेली जनावरे, कोरोनाच्या संसर्गाची भीती, राजस्थान, गुजरातहून जनावरे आणल्याने खरेदी, विक्रीदारांची मोठी गर्दी होती. या माध्यमातून संसर्गाची भीती निर्माण झाली होती.
श्यामकांत सहस्रभोजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : गर्दी टाळण्यासाठी गुरांचा बाजार बंद ठेवण्याबाबतचे आदेश असतानादेखील शुक्रवारी बैलबाजार येथे भारला. परराज्यातून शेकडोंच्या संख्येत जनावरे विक्रीस आणली गेली. कोरोना आजाराबाबत खरेच बाजार समिती संवेदनशील आहे का, असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे.
अमरावती कृषिउत्पन्न बाजार समिती अंतर्गत बडनेऱ्यात दर शुक्रवारी गुरांचा बाजार भरतो.
सध्या कोरोनामुळे गर्दी टाळा, असे सातत्याने सांगितले जात आहे. मात्र, बाजार समितीला याचा विसर पडला. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराआदेशाची थट्टा : परराज्यातून आणली गेली जनावरे, कोरोनाच्या संसर्गाची भीती, राजस्थान, गुजरातहून जनावरे आणल्याने खरेदी, विक्रीदारांची मोठी गर्दी होती. या माध्यमातून संसर्गाची भीती निर्माण झाली होती.
गर्दीत संपर्क टाळा
कृषिउत्पन्न बाजार समितीने कोरोना विषाणूपासून सावध राहण्याबाबत फलक या गुरांच्या बाजारात लावले आहे. त्यांनाच या फलकावरील संदेशाचा विसर पडल्याचे चित्र आहे.
बाजार बंद ठेवण्याचे आदेश ऐनवेळी मिळाले. परराज्यातील गुरांची वाहने पोहोचली होती. पुढील आदेशपर्यंत बाजार बंद ठेवणार आहे.
- किरण साबळे, निरीक्षक