रस्ते दुभाजकांवर गुरांची धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:13 AM2021-07-28T04:13:43+5:302021-07-28T04:13:43+5:30
अमरावती : पावसामुळे रस्त्यांच्या दुभाजकांवर गवत उगवले असल्याने मोकाट गुरांची त्या गवतावर धाव दिसून येत आहे. यामुळे एखादा अपघात ...
अमरावती : पावसामुळे रस्त्यांच्या दुभाजकांवर गवत उगवले असल्याने मोकाट गुरांची त्या गवतावर धाव दिसून येत आहे. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-----------------------------
कोरोना, १०५ रुग्ण ॲक्टिव्ह
(फोटो)
अमरावती : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने सध्या ॲक्टिव्ह रुग्णात घट झालेली आहे. सद्यस्थितीत १०५ रुग्ण सक्रिय आहेत. यापैकी ३३ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-------------------------------
शेतशिवारात कामांची वाढली लगबग
अमरावती : दोन दिवसांपासून पावसाने उसंत दिल्याने शेतात निंदण, खुरपण, डवरे आदी कामांची लगबग वाढली आहे. शेतमजुरांच्या हातालाही काम मिळाले आहे.
----------------------------
पाच दिवसानंतर पावसाची उसंत
अमरावती : पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. सहाव्या दिवशी सोमवारी पावसाने उसंत दिली आहे. आता पाऊस कमी होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
-----------------------
आऊटस्कड भागात डबकी
अमरावती : पाच दिवसांच्या पावसामुळे शहरातील आऊटस्कड भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होत असल्याने रोगराईला निमंत्रण आहे.