मुख्य मार्गावर गुरांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:10 AM2021-06-20T04:10:42+5:302021-06-20T04:10:42+5:30
-------------------- दिवसा उन्ह, रात्री पाऊस अमरावती : चार दिवसांपासून दिवसा अंगाची काहिली करणारे उन्ह व रात्रीला काही ठिकाणी पाऊस, ...
--------------------
दिवसा उन्ह, रात्री पाऊस
अमरावती : चार दिवसांपासून दिवसा अंगाची काहिली करणारे उन्ह व रात्रीला काही ठिकाणी पाऊस, असा निसर्गाचा खेळ सुरू आहे. दमदार पाऊस नसल्यामुळे पेरण्यादेखील खोळंबल्या आहेत.
---------------
आंदोलकांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप
अमरावती : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शनिवारच्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
------------------
शहरात सहा केंद्रावर आज लसीकरण
अमरावती : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ४५ वर्षांवरील नागरिकांना पीडीएमसी येथे कोविशिल्डचा पहिला डोस रविवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत देण्यात येणार आहे. याशिवाय ३० ते ४४ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस डाॅ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, तखतमल महाविद्यालय, हरिभाऊ वाट दवाखाना, बिच्छुटेकडी मनपा दवाखाना, शहरी आराेग्य केंद्र, महेंद्र, काँलनी, आयसोलेशन दवाखाना येथे देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.
-------------------
कोरोनाचे संसर्गात कमी
(फोटो)
अमरावती : दोन आठवड्यांपासून कोरोनाचे संसर्गात कमी आलेली आहे. या कालावधीत एक ते चार टक्क्यांदरम्यान पाॅझिटिव्हिटीची नोंद झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
-------------------
अनलॉकमध्ये मास्कचा नागरिकांना विसर
अमरावती : जिल्हा आता अनलॉक करण्यात आल्यानंतर काही भागात मास्क व फिजिकल डिस्टन्सचा विसर नागरिकांना पडल्याचे दिसून येते. पथकाच्या कारवायादेखील थंडावल्या आहेत.