गोवंशाची चोरी करणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:05 AM2021-05-04T04:05:45+5:302021-05-04T04:05:45+5:30
फोटो पी ०३ करजगाव पान ३ करजगाव : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने करजगावात धाड टाकून गोवंशाची ...
फोटो पी ०३ करजगाव
पान ३
करजगाव : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने करजगावात धाड टाकून गोवंशाची चोरी करणारी टोळी जेरबंद केली. रविवारी करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान एकूण १३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन आरोपींना अटक करण्यात आली, तर अन्य दोन आरोपी पसार झाले आहेत.
मोहम्मद सलमान शेख बशीर (रा. करजगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने त्यांचे साथीदारांच्या मदतीने जिल्हाभरात वेगवेगळ्या गावी जनावरे चोरी केल्याची माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. वेगवेगळ्या चोरीत वेगवेगळी वाहने वापरण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेने करजगाव येथे सापळा रचून आरोपी मोहम्मद सलमान शेख बशीर याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याचा साथीदार मोहम्मद रिझवान मोहम्मद इरफान (२६, रा. बैतूल स्टॉप, परतवाडा) याला ताब्यात घेण्यात आले. दोघांकडून गुन्ह्यात वापरलेली .............................. एमएच १४ एई ५६४५ क्रमांकाच्या दोन चारचाकी वाहनांसह रोख २५ हजार रुपये जप्त करण्यात आले. अधीक्षक हरी बालाजी एन., अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक आशिष चौधरी, सहायक उपनिरीक्षक संतोष मुंदाने, रवींद्र बावणे, पुरुषोत्तम यादव, दिनेश कानोजिया, पंकज फाटे, राहुल कठाणे, सागर धापड, सरिता चौधरी व रीतेश वानखडे यांनी ही कारवाई केली.
------------------
दुसऱ्या वाहनाचा क्रमांक कोणता?