ट्रकसह लाखोंचे सागवान पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:09 AM2021-07-05T04:09:45+5:302021-07-05T04:09:45+5:30

जीव धोक्यात टाकून तीन वनपालांनी अडविले वाहन, परतवाडा वनपरिक्षेत्रातील कारवाई, पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त अनिल कडू परतवाडा : तीन ...

Caught millions of teak with trucks | ट्रकसह लाखोंचे सागवान पकडले

ट्रकसह लाखोंचे सागवान पकडले

Next

जीव धोक्यात टाकून तीन वनपालांनी अडविले वाहन, परतवाडा वनपरिक्षेत्रातील कारवाई, पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

अनिल कडू

परतवाडा : तीन वनपालांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून ४०७ ट्रकसह लाखो रुपयांचे सागवान पकडले. शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, एमएच ०१ एल २२५० क्रमांकाच्या ट्रकमधून अवैध सागवान येत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे शनिवारी रात्री उशिरा नाकेबंदी करून सदर वनपालांनी बुरडघाट-मल्हारा मार्गे धारणी रोडने परतवाड्याच्या दिशेने निघालेला ट्रक पकडण्याचा प्रयत्न केला. ट्रकचालकाने आपला मार्ग बदलविला. चार लाकूड तस्कर दुचाकीने ट्रकमागे असल्याचे वनपालांच्या निदर्शनास आले. त्यांनी जीव धोक्यात टाकून परतवाडा शहरातील होलीक्रॉस प्राथमिक शाळेच्या पुढे या ट्रकला अडवले. चालकाला ताब्यात घेतल्यानंतर वनपाल नितीन अहिरराव यांनी तो ट्रक चालवित परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा केला.

२ लाख ३३ हजार १४६ रुपये किमतीचे २.८२१ घनमीटर सागवान लाकडाचे ५३ नग आणि २ लाख ५० हजारांचा ट्रक किमतीचा ट्रक असा एकूण ४ लाख ८३ हजार १४६ रुपयांचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला. चालक अब्दुल हफिज (३२, रा. चांदूर बाजार) याला वन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. या ट्रकमधून एका मुलगा तेवढ्या रात्री उडी घेत पळून गेला.

अमरावती प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला व परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड यांच्या मार्गदर्शनात वनपाल प्रशांत उमक, नितीन अहिरराव, प्रदीप बाळापुरे व वनरक्षक प्रवीण निर्मळ यांनी ही कारवाई पार पाडली.

-------------------

सागवान नेमके कुठले?

पकडलेले हे अवैध सागवान मध्यप्रदेशच्या जंगलातील आहे की महाराष्ट्राच्या घटांग-बिहाली वनक्षेत्रातील आहे, याचा उलगडा अजून व्हायचा आहे. स्थळ पंचनामा झाल्यानंतरच याचा उलगडा होईल. प्राथमिक माहितीनुसार, परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातून अवैध वाहतूक करीत असताना पकडले गेलेले हे सागवान बुरडघाट-धारखोरा परिसरातील मध्यप्रदेशातील धोत्रा या जंगलातील असल्याचे सांगितले जात आहे. हे लाकूड चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे पाठविण्यात येत होते.

Web Title: Caught millions of teak with trucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.