सावधान, फेसबुकवर फ्रेन्डस रिक्वेस्ट पाठवून केली पैशांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 09:04 AM2021-05-17T09:04:59+5:302021-05-17T09:05:37+5:30
Amravati news facebook सावध राहा, फेक फेसबुकवरून पैशांची मागणी झाल्यास सायबर पोलिसांकडे तक्रार करा, असे आवाहन अमरावती शहर पोलिसांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘फेक फेसबुक’ अकाऊन्टवरून परिचयातील व्यक्तीच्या नावे फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवून त्यानंतर पैशांची मागणी करीत फसवणूक होत असल्याच्या घटना सायबर पोलीस ठाण्याला प्राप्त होत आहे. त्यामुळे सावध राहा, फेक फेसबुकवरून पैशांची मागणी झाल्यास सायबर पोलिसांकडे तक्रार करा, असे आवाहन अमरावती शहर पोलिसांनी केले आहे.
पोलीससूत्रानुसार, ज्यांची फेसबुक प्रोफाईल फेक बनवली आहे. त्यांनी आपल्या स्वत:च्या फेसबुक अकाऊन्टवरून बनविलेली फेक प्रोफाईल शोधावी. ज्या मित्रांना प्रोफाईलवरून रिक्वेस्ट गेली, त्याच्याकडून फेक प्रोफाईलची लिंक (युआरएल) मागवून घ्या. त्या प्रोफाईलवर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील. त्या डॉटवर क्लिक करा, तुमच्यासमोर फाईन्ड सपोर्ट किंवा रिपोर्ट प्रोफाईल हे ऑप्शन येतील. त्यावर क्लिक करा. प्रिटेडींग टु बी समवेअन हा पहिला ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा, पुढे तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील. मी अ फ्रेन्डस आणि सेलीब्रटी. त्यावरील मी ऑप्शन सिलेक्ट करा आणि नेक्स्ट करा, फेक प्रोफाईल अकाऊन्ट काही वेळाने बंद होईल.
अशी करा फेसबुक प्रोफाईल सुरक्षित
स्वत:ची फेसबुक फ्रेन्डलिस्ट अनोळखी व्यक्तीला दिसू नये, याकरिता सेटींगमध्ये जाऊन प्रायवेसी सेटींगवर क्लिक करा. त्यानंतर हु कॅन युवर फ्रेन्ड लिस्टवर जाऊन ओनली मी करा. स्वत:ची फेसबुक प्रोफाईल फोटो अनोळखी व्यक्तीने कॉपी किंवा डाऊनलोड करू नये, याकरिता सेन्टींगमध्ये जाऊन प्रोफाईल लॉगइनवर जाऊन लॉक युवर प्रोफाईल करा. अनोळखीने फ्रेन्ड रिक्वेस्ट करू नये, याकरिता सेन्टींगमध्ये जाऊन प्रायवसी सेन्टींगमधील फ्रेन्ड ऑफ फ्रेन्ड करावे. स्वत:चा फेसबुक अकाऊन्ट सुरक्षित ठेवण्याकरिता सेन्टींगमध्ये जाऊन सिक्युरिटी ॲन्ड लॉगइनवर क्लिक करून टु फॅक्टर अथेंटिकेशन करावे. फेसबुकवरील आपला मोबाईल क्रमांक दिसू नये, याकरिता सेन्टींगमधील प्रायवसी सेन्टींगवर क्लिक करून हु कॅन लुक यु अप युजींग फोन नंबर यु प्रोव्हाईडवर जाऊन ओनली मी हे ऑप्शन क्लिक करावे, असे सायबर पोलिसांनी सांगितले.