सावधान ८३ गावांमध्ये पिण्याचे पाणी ठरू शकते आजाराचे कारण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:10 AM2021-07-15T04:10:46+5:302021-07-15T04:10:46+5:30

जून महिन्यात नमुने दूषित; जिल्हाभरात दोन टप्प्यात होते तपासणी खबरदारी आवश्यक अमरावती : जिल्हाभरात प्रत्येक गावातील पाणी नमुन्यांची ...

Caution Drinking water in 83 villages can be a cause of illness! | सावधान ८३ गावांमध्ये पिण्याचे पाणी ठरू शकते आजाराचे कारण !

सावधान ८३ गावांमध्ये पिण्याचे पाणी ठरू शकते आजाराचे कारण !

Next

जून महिन्यात नमुने दूषित; जिल्हाभरात दोन टप्प्यात होते तपासणी खबरदारी आवश्यक

अमरावती : जिल्हाभरात प्रत्येक गावातील पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात येत असून जून महिन्यात झालेल्या तपासणी ८३ गावांत पाणी नमुने तसेच शहरी भागात ४३ ठिकाणचे नमुने दूषित आढळून आले आहेत. या सर्व ठिकाणांहून २४०३ नमुने संकलित करण्यात आले. त्यापैकी ५.०२ टक्के नमुने दूषित आहेत. यामुळे त्या पाणीस्रोताच्या परिसरातील गावांमध्ये आजाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

जलशुद्धीकरणाबाबत आरोग्य विभागाकडून दक्षता घेतली जात असल्याचे जिल्हा परिषद साथरोग विभागाकडून सांगण्यात आले आहे. ज्या गावांमध्ये दूषित पाणी नमुने आढळून येतात, त्या गावांमध्ये तातडीने उपाययोजना राबविल्या जातात. नमुने दूषित येण्याचे प्रमाण कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, दूषित पाण्यामुळे विविध आजारांचा संसर्ग होत असतो. यातून साथीच्या आजारांचा फैलाव होण्याची शक्यता अधिक असते. यात डायरिया, कॉलरा, गॅस्ट्रो यांसारख्या साथरोगाची लागण होण्याची भीती असते. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत साथरोगावर आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आधी नमुने संकलित केले जातात व त्यानंतर त्याची तपासणी करून त्यांचा अहवाल दिला जातो. यंदा शहर व ग्रामीण मिळून १२६ ठिकाणचे नमुने दूषित आढळून आले आहेत.

बॉक्स

सर्वच ठिकाणी तपासणी होत असल्याचा निर्वाळा

जिल्हाभरातील सर्व ठिकाणी आरोग्य विभागाकडून जल नमुन्यांची तपासणी होत असते, असा निर्वाळा आरोग्य विभागाने दिला आहे. यात शहरी भागात ही तपासणी केली जाते.

जिल्ह्यात ग्रामपंचायतींची संख्या ८४० असून, यातील १७७४नमुन्याची तपासणी करण्यात आली आहे.तर शहरी भागातील ६२९ नमूने संकलित करण्यात आले होते.या दोन्ही मिळून १२६ नमुने दूषित आढळून आले आहेत. दरमहा या जलनमुन्याची तपासणी करून, त्या-त्या गावांमध्ये उपाययोजना राबविल्या जात असल्याचे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मनीषा सूर्यवंशी यांनी सांगितले.

बॉक्स

आता परिस्थितीत सुधारणा

पाणी नमुने दूषित आढळून येत असल्याचे प्रमाण कमी झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. कोरोनाकाळातही नेहमीप्रमाणेच नमुने तपासणी सुरू होती. ज्या गावांमध्ये दूषित पाणी आढळून आले आहे. त्या गावाची यादी ग्रामपंचायत विभागाला दिली जाते. संबंधित ग्रामपंचायतीला याबाबत कल्पना देऊन नक्की पाणी दूषित का झाले, याची चाचपणी करून त्यात या पातळ्यांवर उपाययोजना केल्या जातात.

दूषित पाणीपुरवठा होऊ नये, याकरिता खबरदारीच्या उपाययोजना परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. गळती दुरुस्त करण्याबाबत सूचना दिल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, साथरोग अधिकारी मनीषा सूर्यवंशी यांनी सांगितले.

बॉक्स

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या

दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार होण्याचा धोका असतो. साधारण पावसाळ्यात याची अधिक लागण होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत मान्सूनपूर्व व मान्सूनपश्चात अशा दोन पातळ्यांवर तपासण्या केल्या जातात.

दूषित पाण्यामुळे कॉलरा, गॅस्ट्रो, डायरिया, काविळ, विषमज्वर, गाेवर, एन्फल्युईजा आदी आजारांची लागण होऊ शकते. तेव्हा अशा परिस्थितीत पाणी शुद्ध प्यावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

आरोग्य विभागामार्फत शुद्ध पाणीपुरवठाच्या सूचना असतात. ग्रामपंचायतीच्या दक्षतेने पाळणे गरजेचे आहे. कुठे कोणाला काही आढळून आल्यास त्याची माहिती आरोग्य विभागाला द्यावी, अशा सूचना ग्रामपंचायतींना दिल्या जातात.

बॉक्स

एकूण नमुने तपासणी - २४०३

नमुने आढळले दूषित -८३

दूषित नमुन्यांचे प्रमाण - ५.२

बॉक्स

तालुक्यात सर्वाधिक दूषित

अमरावती -१७.४

धामणगाव रेल्वे -२६.९

चिखलदरा - ६.०

शहर - ६.८

बॉक्स

नमुने -२४०३

दूषित - ८३

तालुकानिहाय आढावा

अमरावती -१२३ - २३

अंजनगाव सुजी - ११६-२

अचलपूर- १६३-५

चांदूर रेल्वे-११३-१

धामणगाव रेल्वे -१०४-२८

चांदूर बाजार -१५०-२

तिवसा -७१-०

दर्यापूर-९०-१

नांदगाव खंडेश्वर-१५४-३

वरूड-९१-०

मोर्शी-१४५-०

भातकुली-५८-०

चिखलदरा १८४-११

धारणी-२०३-७

Web Title: Caution Drinking water in 83 villages can be a cause of illness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.