सावधान, लिंबू सरबतही घातकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 10:45 PM2018-04-08T22:45:56+5:302018-04-08T22:45:56+5:30

मानवाला हवेहवेसे वाटणारे लिंबू सरबत जेवढे आरोग्याला पोषक आहे, तेवढेच ते घातकही ठरू लागले आहे. यामध्ये अखाद्य बर्फाचा वापर होत असल्याने ते आरोग्याला घातक ठरू शकते.

Caution, lemon syrup is deadly | सावधान, लिंबू सरबतही घातकच

सावधान, लिंबू सरबतही घातकच

googlenewsNext
ठळक मुद्देअखाद्य बर्फाचा वापर : उन्हाळ्यात होतो मोह

संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मानवाला हवेहवेसे वाटणारे लिंबू सरबत जेवढे आरोग्याला पोषक आहे, तेवढेच ते घातकही ठरू लागले आहे. यामध्ये अखाद्य बर्फाचा वापर होत असल्याने ते आरोग्याला घातक ठरू शकते.
एप्रिलच्या सुरुवातीला पारा ४३ अंशापर्यंत पोहचलाय. तापत्या उन्हात आपसुकच थंड पाणी आणि शीतपेयांची लालूस उत्पन्न होते. लिंबू सरबत, कोल्ड्रींक्स आणि इतर शीतपेयांच्या गाड्यांकडे पावले वळतात. उन्हामुळे शुष्क झालेल्या घशात मग आपोआपच एका ऐवजी दोेन ग्लास शितपेये ओतली जातात. त्यातल्या त्यात उन्हाळ्यात आरोग्यदायी समजले जाणारे लिंबू सरबत नागरिकांना खास आकर्षित करते. परंतु हे सरबत पित असताना आपण धोकादायक द्रव्य तर शरीरात ओतत नाही ना, याची खात्री करून घेण्याची गरज आहे.
सरबत बनविताना दूषित पाण्याचा वापर केला असल्याने हे सरबत पिल्याने यामुळे टायफाईड व अतिसार सारखे आजार होवू शकतात. लिंबूपाणी तयार करताना वापरण्यात येणारा बर्फ जर दूषित पाण्यापासून तयार केलेला असेल तर अनेक आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचे शितपेय, लिंबूपाणी रिचवताना सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचा सल्ला येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना दिला आहे. लिंबूमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड व व्हिटॅमिन सी असल्यामुळे ते आरोग्याला अतिशय पोषक असते. त्यामुळे अन्नपचनास मदत होते. तसेच शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते. त्यामुळे लिंबूपाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी गरजेचे असते. कोल्ड्रींकपासून शरीरावर होणाऱ्या विपरित परिणांमावर बरेच मंथन आणि जनजागृती होत असल्याने सावध झालेल्या नागरिकांनी त्यांचा मोर्चा लिंबू सरबताच्या गाड्यांकडे वळविला आहे. कमी गुंतवणुकीत जादा फायदा मिळविण्यासाठी बरेच विक्रेते दूषित पाणी व निकृष्ट दर्जाच्या बर्फाचा वापर करतात. यामुळे रोगराई झपाट्याने पसरू शकते. याही पेक्षा घातक प्रकार म्हणजे काही ठिकाणी तर येथील शवच्छिेदन केंद्रात वापरल्या जाणाºया बर्फाच्या लादीचा देखील सरबतासाठी मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याची चर्चा आहे.

अखाद्य बर्फाचे दूषित पाणी पोटात गेल्याने कावीळ, लिव्हरचे आजार, डायरिया, पोटाचे विकार असे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे राहते.
- डॉ. राजेश मुंदे,
एमडी.

Web Title: Caution, lemon syrup is deadly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.