सावधान, ‘लेप्टोस्पायरोसिस’चा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:09 AM2018-06-29T01:09:16+5:302018-06-29T01:10:07+5:30

मुंबईमध्ये ‘लेप्टोस्पायरा’या जीवाणूजन्य आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमिवर राज्यात या आजाराबाबत अलर्ट देण्यात आला आहे. यंदाच्या मान्सूनमधला लेप्टोचा पहिला बळी कुर्ल्यात गेल्याची शंका आरोग्य प्रशासनाला आल्याने राज्यात सर्वदूर त्याचा शिरकाव होऊ नये, यासाठी आरोग्य खात्याने अधिनस्थ यंत्रणेला निर्देश दिले आहेत.

Caution, 'Leptospirios' alert | सावधान, ‘लेप्टोस्पायरोसिस’चा अलर्ट

सावधान, ‘लेप्टोस्पायरोसिस’चा अलर्ट

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईच्या धर्तीवर आवाहन

अमरावती : मुंबईमध्ये ‘लेप्टोस्पायरा’या जीवाणूजन्य आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमिवर राज्यात या आजाराबाबत अलर्ट देण्यात आला आहे. यंदाच्या मान्सूनमधला लेप्टोचा पहिला बळी कुर्ल्यात गेल्याची शंका आरोग्य प्रशासनाला आल्याने राज्यात सर्वदूर त्याचा शिरकाव होऊ नये, यासाठी आरोग्य खात्याने अधिनस्थ यंत्रणेला निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने लेप्टोस्पायरा’बद्दलची सर्व माहिती, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना महापालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केल्या आहेत. मुंबई आणि उपनगरात मागील पाच वर्षा$ंत लेप्टोमुळे तब्बल ४२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
लेप्टोस्पायरोसिस होण्याचा धोका पावसाळ्यात सर्वाधिक असतो. तुंबलेले पाणी, पाण्याची छोटी मोठी तळे किंवा पुराचे पाणी ज्यामध्ये लेप्टोचे जिवाणू आहेत. अशा पाण्याशी संपर्क आल्यास, लेप्टोस्पायरोसिसची लागण होऊ शकते. तसेच प्राण्यांशी संपर्क येणारे व्यक्ती उदा. व्हेटर्नरी व्यवसाय, प्रयोगशाळेत काम करणारे आणि प्राण्यांच्या कत्तलखान्यात काम करणाऱ्या व्यक्तींनादेखील या आजाराचा धोका अधिक संभवतो.

उंदीर, वराह, गाई, म्हशी, श्वान यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. या प्राण्यांच्या लघवीमुळे दूषित झालेले पाणी, माती, भाज्या यांचा माणसांच्या त्वचेची संपर्क आल्यास किंवा जखमा असल्यास लेप्टोस्पायरोसिस हा रोग होतो. सर्वाधिक पाऊस पडल्याने हा आजार होण्याची शक्यता अधिक आहे.

रूग्णास फ्ल्यूसदृश आजाराची लक्षणे दिसून येतात. जसे ताप, थंडी, अंगदुखी, खोकला, डोकेदुखी, स्नायूंचे दुखणे, डोळे लाल होणे, रक्तस्त्राव, रक्ताच्या उलट्या होणे इत्यादी. बरेच रूग्ण एका आठवड्याच्या कालावधीनंतर ताप कमी होऊन बरे होतात. पण, काही रूग्णांमध्ये ३-४ दिवस बरे वाटल्यावर पुन्हा लक्षणे जाणवू लागतात आणि ती गंभीर स्वरूपाची असू शकतात. शरीरातील मुख्य अवयवांना बाधा होते आणि मल्टिसिस्टिम इन्व्हॉल्व्हमेंटमुळे रूग्ण दगाऊ शकतो.
प्लेटलेट्समध्ये झपाट्याने कमी
ताप, स्नायूदुखी, मूत्रपिंड आणि यकृताचे काम बंद पडणे, ही लेप्टोची प्रमुख लक्षणे आहेत. लेप्टो रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊन त्याची प्रकृती गंभीर होते. मुंबईत या आजाराचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमिवर अमरावतीकर नागरिकांनी सजग राहावे, यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुचविल्याची माहिती मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनी दिली.
असा आहे लेप्टोस्पायरोसिस
लेप्टोस्पायरोसिस हा आजार झूनॉटिक (प्राण्यांपासून मनुष्याला होणारा) आजारांच्या श्रेणीमधील आहे. लेप्टोस्पायरा नामक स्पायरोचीट या जातीच्या विषाणूपासून तो पसरतो. प्रथम लेप्टोस्पायराचे जिवाणू सस्तन प्राणी जसे, उंदीर, मांजर, श्वान, गाय, वराह आदींमध्ये संसर्ग करतात आणि या प्राण्यांच्या मुत्रवाटे, हे जिवाणू पाणी अथवा जमिनीत मिसळतात. लेप्टोस्पायरोचे जिवाणू असलेल्या पाण्याशी आणि ओलसर जमिनीशी संपर्क आल्यास मनुष्यास या जिवाणूची लागण होते. त्वचेची अखंडता बाधित झाल्यास, जसे त्वचेला जखम असल्यास, लेप्टोस्पायरा शरीरात प्रवेश मिळवू शकतात. तसेच डोळे, नाक, तोंड आणि जनेंद्रीयांच्या ओलसर त्वचेतूनदेखील लेप्टोस्पायरा शरीरात प्रवेश करू शकतात. पायाला जखमा, चिखल्या, खरचटणे, इसब असेल, तर या जखमेतून हे जंतू रक्तात प्रवेश करतात.

Web Title: Caution, 'Leptospirios' alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य