सावधाव, डेंग्यू रुग्णांचे प्रमाण वाढताहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:13 AM2021-05-20T04:13:03+5:302021-05-20T04:13:03+5:30
भारतातही डेंग्यू रोगाचे प्रमाण अधिक आहे. या रोगाने मृत्यूदेखील होतात. शहरी व दाट वस्तीच्या भागात या रोगाचे रुग्ण अधिक ...
भारतातही डेंग्यू रोगाचे प्रमाण अधिक आहे. या रोगाने मृत्यूदेखील होतात. शहरी व दाट वस्तीच्या भागात या रोगाचे रुग्ण अधिक आढळतात. डेंग्यू रोग विषाणूपासून पसरतो त्याचे चार प्रकार आहेत. या रोगाचा प्रसार लेडीज इजिप्ती डासापासून होतो. डेंग्यू विषाणूयुक्त डास मरेपर्यंत दूषित राहून अनेकांना टंख मारून या रोगाचा प्रसार करतो. हा लेडीज इजिप्ती डास साठलेल्या पाण्यात उदाहरणार्थ रांजण, माठ, कुलर्स, छतावरील टाकाऊ वस्तू, नारळाच्या कवट्या. टायरमध्ये पैदा होतात. हे डास दिवसा चावतात. या डासाच्या पायावर काळे पांढरे ठिपके असतात. म्हणून या डासांना टायगर माॅस्किटो असे म्हणतात.
जीनवचक्र : एडीस इजिप्ती डासांची वाढ चार प्रकारांमध्ये होते. अंडी, अळी, कोश निर्मितीचा काळ तीन ते दहा दिवसांचा असतो.
लक्षण : डेंग्यू तापात एकाकी तीव्रता, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखी, सांधेदुखी, उलट्या, दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोकेदुखी, अशक्तपणा, भूक मंदावणे, ताप कमी जास्त होणे, अंगावर पुरळ येणे, रक्तस्त्राव युक्त डेंग्यू ताप, ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत. डेग्यू ताप बहुतांश १० वर्षे वयोगटातील मुलांना होतो. मोठ्या व्यक्तींनाही होऊ शकतो.
निदान :
रक्तजल नमुने तपासणी व चाचणी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला येथे तपासणी करून निश्चित रोगनिदान होते.
-
उपचार या आजारावर निश्चित असे उपचार उपलब्ध नाहीत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या आजारात औषधे व विश्रांती घेणे आवश्यक आहे. अतिशय घाम येणे, वारंवार उलट्या होणे, जिभेला कोरड पडणे, अशा परिस्थितीत ओआरएस द्रावणाचा वापर करावा.
दक्षता : ॲस्प्रिन औषधी देऊ नये, वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीत औषधोपचार घेणे, रक्तस्त्रावयुक्त डेंग्यू ताप व शोक सिंड्रोम या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्वेक्षण प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष, रक्तनमुने व रक्तजल नमुने घेऊन रक्ताचा गुणांचा शोध घेऊन औषधोपचार करण्यात येते. डास, अळी व नियंत्रण ही सर्वात महत्त्वाची कृती आहे. हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनियाचे डास अंडी घालतात.
कोट
डासोत्पत्ती स्थाने पावसाळ्यात आठवड्यातून एकदा स्वच्छ करावे, पाणीसाठे रिकामे करून कोरडे करावे, साचलेल्या नाल्यावर फवारणी करा, खड्डे बुजवावे, मच्छरदाणीचा वापर करावा, जैविक उपाययोजना डास उत्पत्ती रोखण्यास मदत होईल. त्यादृष्टीने मोहीम राबवित आहे.
- शरद जोदी, जिल्हा हिवताप अधिकारी