लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:50 PM2018-05-14T23:50:20+5:302018-05-14T23:50:47+5:30

वाढत्या चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाने लांब पल्ल्यांच्या काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा बलासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची जोड असणार आहे.

CCTV cameras in long distance trains | लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

Next
ठळक मुद्देप्रवाशांची सुरक्षितता : मध्य रेल्वे मुंबई विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वाढत्या चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाने लांब पल्ल्यांच्या काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा बलासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची जोड असणार आहे.
रेल्वे गाड्यांमध्ये चोरांनी हैदोस घातला आहे. विशेषत: चोरट्यांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांना लक्ष्य केले आहे. परिणामी चोरट्यांसह खिसेकापूंवर पाळत ठेवण्यासाठी डब्यांमध्ये दर्शनी भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून प्रवाशांची सुरक्षितता केली जाणार आहे. रेल्वे गाड्यात चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यात रेल्वे सुरक्षा बलाला अपयश आल्याबाबत यंत्रणेवर टीका होत आहे. यापूर्वी रेल्वे प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर मुंबई ते दिल्ली राजधानी एक्सप्रेसच्या चार डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रयोग यशस्वी केला.आता लांब पल्ल्यांच्या गाड्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्यांमध्ये
लागणार सीसीटीव्ही
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाहून सुटणाºया काही महत्त्वाच्या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहे. यात भुसावळ, नागपूरमार्गे ये- जा करणाºया रेल्वे गाड्यांचा समावेश असणार आहे. हावडा-मुंबई मेल, मुंबई-हावडा गितांजली एक्सप्रेस, कुर्ला-हावडा शालीमार एक्सप्रेस, गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस, हावडा-मुंबई सुपर डिलक्स एक्सप्रेस या गाड्यांमधील डब्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रवाशांची सुरक्षितता होणार आहे.

रेल्वे गाड्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय प्रशंसनीय आहे. चोरट्यांवर यामाध्यमातून नियंत्रण मिळविता येईल. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये सीसीटीव्ही गरजेचे आहे.
- व्ही.डी. कुंभारे
वाणिज्य मंडळ निरीक्षक

Web Title: CCTV cameras in long distance trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.