गणेश विसर्जनावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:16 AM2021-09-06T04:16:18+5:302021-09-06T04:16:18+5:30
महापालिका आयुक्तांकडून स्थळाची पाहणी, प्रथमेश जलाशय, छत्री तलाव परिसरात सुविधांचा आढावा अमरावती : येथील प्रथमेश जलाशय, छत्री तलावावर दरवर्षी ...
महापालिका आयुक्तांकडून स्थळाची पाहणी, प्रथमेश जलाशय, छत्री तलाव परिसरात सुविधांचा आढावा
अमरावती : येथील प्रथमेश जलाशय, छत्री तलावावर दरवर्षी गणेश विसर्जन करण्यात येते. त्यानुसार विसर्ज़नासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी पाहणी केली. यंदा गणेश विसर्जन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहे.
यावेळी शहर अभियंता रवींद्र पवार, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखीले, जनसंपर्क अधिकारी
भूषण पुसतकर, उपअभियंता भास्कर तिरपुडे, श्यामकांत टोपरे, अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे, स्वास्थ अधीक्षक विजय बुरे, अभियंता नितीन बोबडे, स्वास्थ निरीक्षक कुंदन हडाले, स्वास्थ निरीक्षक पंकज तट्टे, आशिष सहारे उपस्थित होते.
मनपा आयुक्तांनी आरोग्य विभागाला निर्देशित करताना गणेशोत्सव मार्गांची दैनंदिन साफसफाई व आरोग्यविषयक दैनंदिन फवारणी करावी, विसर्जन ठिकाणी निर्माल्याकरिता स्वतंत्र व्यवस्थापन करावे, विसर्जनस्थळी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था, विसर्जनस्थळी प्राथमिक आरोग्य पथक ॲम्बुलंन्ससह सज्ज ठेवणे तसेच आवश्यक ठिकाणी टॅकमधील पाण्यातील गाळ व कचरा काढण्याचा सूचना करण्यात आल्यात. आर्टीफिशीयल टँक ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. पशुवैद्यकीय विभागामार्फत गणेशोत्सव विसर्जनाच्या काळात रस्त्यावरील व विसर्जन परिसरात मोकाट जनावरे पकडण्याची व्यवस्था करावी. या परिसरात मोकाट जनावर आढळणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे महापालिका आयुक्त रोडे यांनी सांगितले.
उद्यान विभागामार्फत विसर्जनाच्या मार्गावरील झाडांच्यात फांद्या छाटण्याचे काम पूर्ण करावे तसेच अग्निशमन विभागाने विसर्जन स्थळी आपातकालीन पथक तैनात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अतिक्रमण विभागामार्फत विसर्जनस्थळी दरवर्षीप्रमाणे व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच विसर्जनासाठी निर्मित केलेल्या खड्डयाचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यााचे निर्देश मनपा आयुक्तांनी यावेळी दिले. अग्निशमन विभागाला विसर्जन स्थळी अग्निशमन पथक सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. महापालिका आयुक्तांनी विसर्जनस्थळी प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही तसेच जनरेटर लावण्याचे निर्देश दिले आहेत.