विसर्जनस्थळी सीसीटीव्हीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:16 AM2021-09-14T04:16:27+5:302021-09-14T04:16:27+5:30

फोटो पी १३ सीपी अमरावती : विसर्जनस्थळी पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात यावी, त्या ठिकाणी कोणताही अपघात घडू ...

CCTV footage of the immersion site | विसर्जनस्थळी सीसीटीव्हीची नजर

विसर्जनस्थळी सीसीटीव्हीची नजर

Next

फोटो पी १३ सीपी

अमरावती : विसर्जनस्थळी पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात यावी, त्या ठिकाणी कोणताही अपघात घडू नये याकरिता पक्के बॅरिकेडिंग करणे व स्वीमर्स (पट्टीचे पोहणारे ) ठेवण्याबाबत तसेच नवीन रस्त्याची उंची वाढल्याने रस्त्यालगत मुुरुम टाकून सपाटीकरण करण्यात यावे, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी तसेच पार्किंग व तलावाचे ठिकाणी लाईट व सीसीटीव्ही बसावावे आणि हे काम जलदगतीने करावे, अशा सूचना पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिल्या.

पोलीस आयुक्तांनी छत्रीतलाव येथील श्रीगणेश विसर्जन स्थळाला भेट दिली व कृत्रिम तलाव निर्मितीच्या कामाचा आढावा घेतला. प्रथमेश तलाव येथील विसर्जनस्थळी भेट दिली. त्या जागेची पाहणी केली. यावेळी उपायुक्त विक्रम साळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल आठवले, कनिष्ठ अभियंता बोबडे हजर होते.

Web Title: CCTV footage of the immersion site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.