आश्रमशाळांची सीसीटीव्ही खरेदी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 04:40 AM2018-01-06T04:40:34+5:302018-01-06T04:40:51+5:30
आदिवासी विकास विभागाच्या ५५२ आश्रमशाळांसाठी सीसीटीव्ही खरेदीच्या ई-निविदेस राज्य शासनाने ‘ब्रेक’ दिला आहे. परिमाणी, यापूर्वीची ई-निविदा प्रक्रिया गुंडाळण्यात आली आहे.
- गणेश वासनिक
अमरावती - आदिवासी विकास विभागाच्या ५५२ आश्रमशाळांसाठी सीसीटीव्ही खरेदीच्या ई-निविदेस राज्य शासनाने ‘ब्रेक’ दिला आहे. परिमाणी, यापूर्वीची ई-निविदा प्रक्रिया गुंडाळण्यात आली आहे. आता केंद्र सरकारच्या गव्हर्नमेंट मार्केट प्लेस (गेम) पोर्टलमधून ते खरेदी करावे लागणार असल्याचे पत्र विभागाच्या आयुक्तांनी पाठविले आहे.
ठाणे, नाशिक, नागपूर व अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत २९ प्रकल्प कार्यालयांतर्गत ५२२ शासकीय आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकारचे विशेष साहाय्य अनुदान उपलब्ध करून देण्यात आले. अमरावती २ कोटी, नागपूर ५ कोटी, नाशिक ७ कोटी, तर ठाणे ८ कोटी असे अनुदान मिळाले. चारही अपर आयुक्त कार्यालयस्तरावर मागणीनुसार सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीची ई-निविदा राबविण्यात आली.