कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी साधेपणाने साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:13 AM2021-03-27T04:13:32+5:302021-03-27T04:13:32+5:30
अमरावती : मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा ‘होळी’चा सण यंदा कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरी ...
अमरावती : मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा ‘होळी’चा सण यंदा कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करावा व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन महापौर चेतन गावंडे यांनी शुक्रवारी केले आहे.
शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. या परिस्थितीचा विचार करता २८ व २९ मार्चला असलेला ‘होळी उत्सव साधेपणाने साजरा करावा. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार होळीत लाकडे जाळणे तसेच यामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाचा विचार करता, होळी पेटवण्यात येऊ नये. धूलिवंदनाच्या दिवशी रंगांचा वापर न करता पाण्याचा अपव्यय टाळावा, सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही, अशा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करू नये, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
बॉक्स
अन्यथा दंडनीय, कायदेशीर कारवाई
शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ६०, साथरोग नियंत्रण अधिनियम, १८ ९ ७ व भारतीयच दंडसंहिता, १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.