परंपरा जपून साजरा करा गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:59 PM2017-08-24T23:59:25+5:302017-08-24T23:59:58+5:30

सण-उत्सव साजरे करताना अमरावतीकरांच्या परंपरेला गालबोट न लावता सौहार्द कायम ठेवण्याचे आवाहन आ.यशोमती ठाकूर यांनी केले.

Celebrate the tradition, celebrate Ganesh Festival | परंपरा जपून साजरा करा गणेशोत्सव

परंपरा जपून साजरा करा गणेशोत्सव

Next
ठळक मुद्देयशोमती ठाकूर : पोलीस आयुक्तालयात गणेशोत्सव, दुर्गोत्सव मंडळ सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सण-उत्सव साजरे करताना अमरावतीकरांच्या परंपरेला गालबोट न लावता सौहार्द कायम ठेवण्याचे आवाहन आ.यशोमती ठाकूर यांनी केले. नियमांना अनुसरून आणि पर्यावरणाला पोषक असा गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सव आणि दुर्गोत्सव मंडळासाठी गुरुवारी पोलीस आयुक्तालायातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बक्षिस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे, महापालिका आयुक्त हेमंत पवार, भाजपचे किरण पातुरकर, उपमहापौर संध्या टिकले, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, जिल्हा परिषदेचे सभापती जयंत देशमुख, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, एसआरपीएफचे समादेशक महेश चिमटे यांच्यासह तीनही पोलीस उपायुक्त आणि पोलीस अधिकाºयांची उपस्थिती होती.
कम्युनिटी पोलिसिंगचा एक भाग म्हणून गतवर्षी उत्कृष्ट गणेश आणि दुर्गोत्सव मंडळासाठी स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेतील विजेत्यांना गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. लोकाभिमुख पोलिसिंगवर आपला भर असून त्याचाच परिपाक म्हणून आपल्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल्याचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सांगितले. पोलीस ‘व्हिजिबल’ असल्याने अमरावतीकर स्वत:ला सुरक्षित समजत असल्याचे आपल्याला समाधान आहे, असे ते म्हणाले. तर शहराची उत्सवप्रियता लक्षात घेता पोलिसांनी उत्सवापुरता पोलिसी खाक्या बाजूला ठेवत मंडळांना सहकार्य करण्याचे आवाहन किरण पातुरकर यांनी केले. शहरातील वाढते धूळकण आणि ध्वनीप्रदूषण रोखण्यास आम्ही मागे पडलो आहोत, अशी खंत व्यक्त करीत आयुक्त हेमंत पवार यांनी पर्यावरणाचा विचार करून मातीच्या गणपतींची स्थापना करावी, सोबतच पर्यावरणपूरक उत्सवाचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. उपमहापौर संध्या टिकले यांनी चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. मंडळांनी उत्सवाच्या खर्चात काटकसर करून सामाजिक निधी उभारण्याचे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांनी केले. गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि पालकमंत्री प्रवीण पोटे यांना वेळेवर मुंबईला जावे लागल्याने त्यांच्या हस्ते होणारा सायबर पोलीस स्टेशन व आधुनिक पारपत्र विभागाचा उद्घाटन सोहळा तात्पुरता स्थगित केल्याची माहिती सीपींनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष यशोमती ठाकूर यांचे भाषण संपल्यानंतर गणेश मंडळ व दुर्गोत्सव मंडळांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. एक गाव एक गणपती अंतर्गत बोरगाव धर्माळेस्थित जयभवानी गणेश मंडळ आणि मुस्लिम समाजाचे अध्यक्ष शिवणगाव येथील आझाद गणेश उत्सव मंडळाच्या रशिद शब्बीर शहा यांच्यासह बक्षीस मूल्यमापन समितीतील अजय गाडे, संभाजी शिरसाटल, माधुरी देशपांडे, शिरीन खान, रतण गुजर, पुरुषोत्तम हरवानी यांना सन्मानित करण्यात आले.

पारितोषिक प्राप्त गणेश मंडळे
प्रथम (शहर विभाग) : श्री एकवीरा युवक गणेश मंडळ-राजापेठ,द्वितीय-नमुना सार्वजनिक मंडळ, तृतीय-बजरंग गणेश मंडळ-पटवीपुरा
प्रथम (ग्रामीण विभाग) : लोकमान्य गणेशोत्सव मंडळ-वलगाव, द्वितीय-बालगणेश गणेशोत्सव मंडळ टाकरखेडा संभू, तृतीय-अंकूर गणेशोत्सव मंडळ, टाकरखेडा संभू,
विशेष प्रोत्साहनपर : लक्ष्मीकांत मंडळ-खोलापुरी गेट,शिवशक्ती मंडळ-महादेवखोरी, नीळकंठ मंडळ-बुधवारा, राजापेठ स्पोर्टिंग क्लब,
प्रोत्साहनपर : श्री साईबाबा मंडळ-साईनगर, आझादहिंद मंडळ-बुधवारा कृषी उत्पन्न बाजार समिती गणेश मंडळ, श्रीकृष्णपेठ गणेश मंडळ

पारितोषिकप्राप्त दुर्गोत्सव मंडळ
प्रथम : एकता सार्वजनिक नवदुर्गा
मंडळ-आसरा
द्वितीय : विरप्रताप नवदुर्गा महोत्सव-सराफा
तृतीय : वीर अभिमन्यू दुर्गोत्सन मंडळ
पन्नालालनगर

Web Title: Celebrate the tradition, celebrate Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.