छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:36 AM2021-02-20T04:36:36+5:302021-02-20T04:36:36+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शुक्रवारी साजरी करण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, ...

Celebrating the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

Next

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शुक्रवारी साजरी करण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, वित्त व लेखाधिकारी भारत कऱ्हाड, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी आदींनी प्रतिमांचे पूजन करुन अभिवादन केले.

-----------------

एकता रॅली आयोजन समिती

येथील एकता रॅली आयोजन समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवटेकडीवर साजरी झाली. यावेळी राजू नन्नावरे, सलिम मीरावाले, नाना रमतकार, प्रवीण वासनिक आदींनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी

शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.

--------------

युवा स्वाभिमान संघटना

युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांनी बडनेरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

भीम ब्रिगेडतर्फे अभिवादन

भीम ब्रिगेड संघटनेच्यातीने काटसूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राजेश वानखडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. दीपक सरदार, विक्रम तसरे, गौतम सवाई, रोशन गडलिंग, नितीन काळे आदी उपस्थित होते.

----------------

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

फरशी स्टाॅप येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण करण्यात आले. राणा दाम्पत्यांनी बुलेट रॅली काढून शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. यावेळी शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.

Web Title: Celebrating the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.